अयोध्येत राममंदिर बांधले, तर देहलीपासून काबूलपर्यंत विध्वंस घडवू ! – जैश-ए-महंमदची धमकी

  • हिंदूंच्या श्रद्धास्थानांवरील जिहादी आतंकवादाचे सावट काँग्रेसप्रमाणे भाजप सरकारही दूर करू शकत नाही, हेच यावरून सिद्ध होते ! हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या रक्षणार्थ हिंदु राष्ट्रच हवे !
  • हिंदूंनो, छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन तुमच्या मुळावर उठलेल्या जिहाद्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी संघटित व्हा !
  • अशी धमकी देण्याचे कोणाचे धाडस होणार नाही, अशी तात्काळ कृती केली पाहिजे, हे सरकारच्या का लक्षात येत नाही ? शत्रूला तात्काळ फासावर लटकवल्यासच देशाकडे कोणाचे वाकड्या नजरेने पहाण्याचे धाडस होणार नाही, हे सरकारच्या लक्षात येईल, तो सुदिन !   

मसूद

नवी देहली – अयोध्येत बाबराच्या मशिदीच्या जागी जर राममंदिर बांधले, तर देहलीपासून काबूलपर्यंत सर्वत्र विध्वंस घडवू, अशी धमकी ‘जैश-ए-महंमद’ या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याने दिली. बाबरी मशिदीविषयी त्याच्या प्रसारित झालेल्या ९ मिनिटांच्या एका चित्रफितीत ही धमकी देण्यात आली आहे. (मूठभर आतंकवाद्यांना चिरडून टाकण्याऐवजी त्यांच्या धमक्या ऐकत बसणे भाजप सरकारला लज्जास्पद ! हिंदूंना राममंदिर उभारण्याचे आश्‍वासन देऊनही ते पूर्ण न करणार्‍या भाजप सरकारने उद्या या धमकीचे निमित्त करून राममंदिर बांधण्यास नकार दिला, तरी आश्‍चर्य वाटणार नाही ! – संपादक)

या चित्रफितीत त्याने पुढे म्हटले आहे की, अयोध्येत बाबरी मशीद पाडून तेथे तात्पुरते राममंदिर बांधण्यात आले आहे. हिंदु लोक तेथे त्रिशूळ घेऊन एकत्र येऊन मुसलमानांना घाबरवत आहेत. आम्हाला पुन्हा एकदा बाबरी मशीद बोलावत आहे. राममंदिर बांधले गेले, तर मुसलमान मुले त्याचा सूड उगवण्यासाठी सिद्ध आहेत. आम्हीही विध्वंस घडवून आणण्यासाठी पूर्णपणे सिद्ध आहोत. आमचे बाबरी मशिदीकडे पूर्ण लक्ष आहे. त्यासाठी आम्ही प्राण द्यायलाही सिद्ध आहोत.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now