बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे विश्वतकल्याणार्थ महासोमयाग भावपूर्ण वातावरणात पूर्णाहुतीने संपन्न !

वासोधारा आणि पूर्णाहुती देतांना अग्निहोत्र प्रचारक पू. दादाश्री जाधव (डावीकडून चौथे आणि चष्मा घातलेले) आणि सपत्नी वाजपेयाजी रघुनाथ काळे गुरुजी, तसेच अन्य वेदमूर्ती आणि ब्रह्मवृंद

बार्शी (जिल्हा सोलापूर), ३० नोव्हेंबर (वार्ता.) – येथील कासारवाडी (तालुका बार्शी) येथे आयोजित करण्यात आलेल्या ११ दिवसांचा वाजपेयी आणि बृहस्पती महासोमयाग २९ नोव्हेंबर या दिवशी भावपूर्ण वातावरणात पूर्णाहुतीने संपन्न झाला. संपूर्ण विश्‍वामध्ये सुखशांती नांदावी, तसेच नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण व्हावे, यासाठी या यागाचे आयोजन करण्यात आले होते. अग्निहोत्राचे प्रचारक पू. दादाश्री जाधव आणि वाजपेयाजी रघुनाथ काळे गुरुजी यांनी सपत्नी पूर्णाहुती दिली. १९ नोव्हेंबर या दिवशी या महासोमयागाचा प्रारंभ झाला होता. या वेळी पू. दादाश्रींचे भक्त आणि शिष्य, तसेच सनातन संस्थेचे साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. देहत्याग केलेले प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या पश्‍चात प्रथमच सोमयाग आयोजित केला होता. ‘हा सोमयाग पू. नानांच्याच आशीर्वादाने निर्विघ्नपणे पार पडला’, असे प.पू. नाना काळेगुरुजी यांचे ज्येष्ठ सुपुत्र रघुनाथ काळेगुरुजी यांनी सांगितले.

२. या वेळी प.पू. नाना काळेगुरुजी यांच्या पत्नी पू. (श्रीमती) वैजयंती काळे तथा माई यांनी, ‘अग्निनारायण सनातन संस्थेवरील सर्व संकटे दूर करील’, असे सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF