लातूरमधील मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघातास पायलट उत्तरदायी ! – विमान दुर्घटना पथकाचा निष्कर्ष

मुंबई – अतिरिक्त वजनासह पायलटने हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचा प्रयत्न केल्यामुळे लातूरमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातास पायलट उत्तरदायी असल्याचा निष्कर्ष विमान दुर्घटना पथकाने चौकशी अहवालात नमूद केला आहे. लातूरहून मुंबईला येण्यासाठी टेकऑफ करतांना हायटेंशन वायरला धक्का लागल्याने हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत सर्व जण थोडक्यात वाचले होते; परंतु भरत कांबळे यांच्या घराजवळ हेलिकॉप्टर पडल्याने त्यांच्या घराची हानी झाली होती. प्रशासनाने ती भरून दिली नाही; मात्र प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी पुढाकार घेऊन कांबळे यांचे घर दुरुस्त करून दिले.


Multi Language |Offline reading | PDF