मुंबईतील ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर रहित करण्याविषयी निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेला आश्वासन

मुंबई – मुंबईतील ५०० चौरस फूट आणि त्यापेक्षा अल्प क्षेत्रफळांच्या घरांचा मालमत्ता कर रहित करण्याविषयी सरकार लवकरच निर्णय घेईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना विधानभवनात दिले. मुंबई महापालिकेने यासंदर्भातील प्रस्ताव संमत करून राज्य सरकारकडे पाठवला आहे; परंतु तो प्रलंबित आहे. यावर पुढील कार्यवाही होण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली.


Multi Language |Offline reading | PDF