राज्यात गोवरचे १० सहस्र रुग्ण

गोवर रुबेला लसीकरण मोहीम चालू

मुंबई, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – वर्ष २०१६ च्या आकडेवारीनुसार गोवरमुळे देशभरात प्रतिवर्षी ४९ सहस्र २०० मुलांचा मृत्यू होतो. राज्यात गोवरचे १० सहस्र रुग्ण आहेत. गोवर निर्मूलन आणि रुबेरा नियंत्रण यांसाठी सरकारच्या वतीने राबवण्यात येणार्‍या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेला २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला. मोहिमेच्या अंतर्गत ९ मास ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना लसीकरण करण्यात येणार आहे. ही लस पूर्णतः सुरक्षित असून ६ आठवड्यांमध्ये व्यापक स्तरावर हा उपक्रम राबण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधीमंडळाच्या पत्रकारकक्षात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.


Multi Language |Offline reading | PDF