(म्हणे) ‘राज्यघटनेचे मुख्य सूत्र म्हणजे धर्मनिरपेक्षता !’

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे रावसाहेब पवार यांचे बौद्धिक दिवाळखोरी दर्शवणारे विधान

भोर (जिल्हा पुणे) – फाटलेल्या देशाला संविधानाने शिवणारा मानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या स्मरणाने माणसाचा उद्धार होतो, तर विस्मरणाने अध:पतन होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जय भीम हे शब्द हृदयात असतील, तर कोणाला घाबरायची आवश्यकता नाही. राज्यघटनेचे मुख्य सूत्र धर्मनिरपेक्षता हे होते, असे विधान महाराष्ट्र साहित्य परिषदेचे रावसाहेब पवार यांनी केले. येथील गर्ल्स हायस्कूलच्या मैदानात २४ आणि २५ नोव्हेंबरला ‘फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते.

या वेळी ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत श्री. उत्तम कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. कुमार सप्तर्षी, श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्था, कोल्हापूरचे अध्यक्ष प्रा. अक्षयकुमार साळुंखे उपस्थित होते.

संमेलनात परिवर्तन, क्रांती या शब्दांच्या नावाखाली गलीच्छ, अश्‍लील, बीभत्स शब्दांचा वापर होत होता. ‘मासिक पाळी ही हिंदु धर्मातील अनिष्ट प्रथा असून स्त्रियांच्या पायातील बेडी आहे’, असे सांगण्यात आले.

क्षणचित्र

८०० ते ९०० आसनव्यवस्था असणार्‍या कार्यक्रमाच्या ठिकाणी ५० ते ६० इतकीच उपस्थिती होती.

संमेलन कि वैचारिक प्रदूषण ?

संमेलनात वक्त्यांचे मार्गदर्शन आणि कविता यांच्या माध्यमातून हिंदु धर्म अन् संस्कृती यांच्या विरोधात विचार मांडले गेले. एका कवयित्रीने महिलांवरील बलात्काराविषयी कविता सादर करतांना अतिशय गलीश्‍च, अश्‍लील, अर्वाच्च शब्दांचा वापर केला, ती अश्‍लील कविता ऐकल्यावर तेथील ४ महिलांनी उठून जाणे पसंत केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now