खलिस्तानी नेत्यासमवेत छायाचित्र प्रसिद्ध झाल्यावर काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर टीकेची झोड

  • हे आहे काँग्रेसच्या नेत्यांचे खरे स्वरूप ! यापूर्वी सिद्धू यांनी पाकच्या सैन्यप्रमुखांना आलिंगन दिले होते आणि आता खलिस्तानी नेत्यासमवेत त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे ! हा देशद्रोहच नव्हे का ?
  • खलिस्तानीप्रेमी आणि पाकप्रेमी यांना रोखू न शकणार्‍या भाजप सरकारकडून शत्रूचा बीमोड होणे केवळ अशक्य आहे !

इस्लामाबाद – पाकमध्ये करतारपूर मार्गिकेच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित असलेले पंजाबमधील मंत्री तथा काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू यांचे खलिस्तानी नेता गोपाल चावला याच्यासमवेत छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. यामुळे सिद्धू यांच्यावर चोहोबाजूंनी सडकून टीका होत आहे. ‘या प्रकरणी सिद्धू यांनी त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी अकाली दल आणि अन्य विरोधी पक्ष यांनी केली आहे.

करतारपूर मार्गिकेमुळे पाकिस्तानातील करतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब हे गुरुनानक साहेबांचे समाधीस्थळ आणि भारतातील गुरुदासपूर येथील डेरा बाबा नानक हे स्थान थेट जोडले जाणार आहे. या मार्गिकेचे काम ६ मासांत पूर्ण होण्याची शक्यता असून त्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम २८ नोव्हेंबरला पाकिस्तानमध्ये पार पडला. या कार्यक्रमात भारताच्या वतीने नवज्योसिंह सिद्धू, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि हरदीपसिंह पुरी हे सहभागी झाले होते. या कार्यक्रमात खलिस्तानी नेता गोपाल चावला हादेखील उपस्थित होता. सिद्धू यांचे चावलासमवेत छायाचित्रही सर्वत्र प्रसिद्ध झाले आहे. चावला याचे पाकिस्तानातील जिहादी आतंकवादी हाफिज सईदशीही संबंध आहेत. याच कार्यक्रमात पाकचे सैन्यप्रमुख बाजवा यांनी चावला याची भेट घेतल्याचेही छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. यावर पाकने स्पष्टीकरण देत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now