माओवाद्यांच्या केंद्रीय नेतृत्वात खांदेपालट

रायपूर – हिंसक कारवाया करणार्‍या भाकपच्या (माओवादी) केंद्रीय नेतृत्वात पालट करण्यात आला आहे. गेल्या १३ वर्षांपासून पक्षाच्या प्रमुखपदी असलेला मुपल्ला लक्ष्मण राव उपाख्य गणपति याने त्यागपत्र दिले असून त्याच्या जागी जहाल नक्षलवादी नंबाल्ला केशव राव उपाख्य बसवराजू याची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे प्रवक्ते अभय याने एका पत्रकाद्वारे दिली. वाढते वय आणि प्रकृती अस्वास्थ्य यांमुळे गणपतीने पदत्याग केल्याचे सांगितले जाते.

तब्बल ४० वर्षांहून अधिक काळापासून माओवादी चळवळीत सहभागी असलेला गणपति एका शाळेत शिक्षक होता. शिक्षकी पेशा सोडल्यानंतर तो माओवादी चळवळीत अधिक सक्रीय झाला. बसवराजू हाही गेल्या २७ वर्षांपासून नक्षलवादी चळवळीत सक्रीय असून त्याच्यावर विविध राज्यांनी १ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची बक्षिसे घोषित केली आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now