भारताने पाकचे ‘सार्क’ परिषदेचे निमंत्रण फेटाळले

‘केवळ असल्या परिषदांवर बहिष्कार घालून पाकच्या कुरापती थांबणार नाहीत, तर त्यासाठी त्याला प्रत्यक्ष धडा शिकवणेही आवश्यक आहे’, हे सरकारच्या लक्षात कसे येत नाही ?

इस्लामाबाद – पाकने दिलेले ‘सार्क’ परिषदेला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण भारताने फेटाळून लावले. इतकेच नव्हे, तर ‘सार्क’मधील अन्य ७ राष्ट्रांना (भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भुतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका) न विचारता ही परिषद भरवणारा पाकिस्तान कोण ?’, असा प्रश्‍नही भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने विचारला. ‘सर्व देशांनी होकार दिल्यासच ‘सार्क’ परिषद पुन्हा चालू होईल’, असेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

प्रतिवर्षी दक्षिण आशियातील वरीलपैकी एका देशात ‘सार्क’च्या सर्व राष्ट्रांची बैठक होते. वर्ष २०१६ मध्ये भारतीय सैन्याच्या उरी येथील तळावर पाकपुरस्कृत आतंकवाद्यांनी आक्रमण केले होते. या पार्श्‍वभूमीवर ‘सार्क’च्या परिषदेत भाग घेण्यास भारताने नकार दिला. (‘केवळ परिषदेवर बहिष्कार घालणे नव्हे, तर पाकला धडा शिकवणे, हाच उरी आक्रमणाचा सूड उगवणे आहे’, हे सरकारच्या लक्षात कसे येत नाही ? – संपादक) अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ या राष्ट्रांनीही भारताला पाठिंबा दिला होता. तेव्हापासून गेल्या २ वर्षांत ‘सार्क’ची एकही बैठक झाली नाही.

आतंकवाद आणि चर्चा एकत्रितपणे होऊ शकत नाही ! – सुषमा स्वराज

भोपाळ – ‘सार्क’ परिषदेत जाण्यापूर्वी आम्हाला पठाणकोट आणि उरी आक्रमणांचा विचार करावा लागेल. आतंकवाद आणि चर्चा एकत्रितपणे होऊ शकत नाही, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केले. पाकने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या ‘सार्क’ परिषदेच्या निमंत्रणाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना त्या बोलत होत्या. ‘सार्क’ परिषदेत भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये जाणार नाहीत’, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाकने करतारपूर ‘कॉरिडॉर’ (भारतातील शीख बांधवांना पाकमधील करतारपूर येथील गुरुद्वारापर्यंत जाण्यासाठी निर्माण करण्यात येणारा जोडमार्ग) चालू केला; म्हणून भारत-पाक चर्चा होण्याची शक्यताही त्यांनी फेटाळून लावली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now