बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार बांधणार १० सूर्यमंदिरे

  • हिंदुद्वेषी तृणमूल काँग्रेसने बंगालमधील हिंदूंची आणि हिंदुत्वाची केलेली अपरिमित हानी पहाता त्याने हिंंदूंना भुलवण्यासाठी अशी कितीही मंदिरे बांधली, तरी त्याचे पापक्षालन कदापि होणार नाही ! यासाठी हा पक्ष कायमचा नष्ट होणे, हीच शिक्षा त्याला योग्य ठरेल !
  • रोहिंग्या मुसलमानांसाठी आश्रयदाते ठरलेल्या तृणमूल काँग्रेसचे अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्याचे प्रमाण इतके पराकोटीचे आहे की, त्याने उद्या या मंदिरांचे रूपांतर अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळात केले, तरी आश्‍चर्य वाटणार नाही !

कोलकाता – बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाने राज्यातील आसनसोल, दुर्गापूर या पूर्वेकडील भागांत १० सूर्यमंदिरे बांधण्याची योजना आखली आहे. पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाच्या आधारे मते मिळवण्यापासून रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेसनेही सौम्य हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याचे मानले जात आहे. तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आसनसोलचे महापौर जितेंद्रकुमार तिवारी म्हणाले, ‘‘पुढील वर्षी छटपूजेपर्यंत या मंदिरांचे बांधकाम पूर्ण झालेले असेल.

दुर्गापूर, आसनसोल परिसरात हिंदी भाषिकांची संख्या मोठी आहे. प्रतिवर्षी या ठिकाणी छटपूजेला भाविकांची गर्दी होते. त्यांची सेवा करण्याच्या दृष्टीने आम्ही १० मंदिरे बांधण्याचे ठरवले आहे. पुढील मासाअखेरपर्यंत मंदिरांचे आराखडे सिद्ध होतील. मंदिर उभारणीसाठी २ कोटी रुपयांचा व्यय (खर्च) अपेक्षित आहे. आम्ही मंदिरांसाठी स्थानिकांकडून निधी गोळा करण्यास आरंभ केला आहे.’’ (याचा अर्थ पक्षाच्या खजिन्यातून नव्हे, तर जनतेच्या खिशातून मंदिर बांधण्याचा तृणमूल काँग्रेसचा डाव आहे. हिंदु समाजाविषयी एवढाच कळवळा आहे, तर तृणमूल काँग्रेस स्वतःच्या तिजोरीतून ती का उभारत नाही ? यातून त्याचे खरे स्वरूप उघड होते ! – संपादक) तिवारी हेच या योजनेची धुरा सांभाळत असून ते ‘छटपूजा समिती’चे अध्यक्षही आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now