(म्हणे)‘राममंदिर अयोध्येतच कशाला हवे ?’ – फारुख अब्दुल्ला यांचा हिंदुद्वेष

  • ‘राममंदिर पाडणारा इस्लामी आक्रमक बाबरच्या नावाची मशीद अयोध्येसारख्या पवित्र ठिकाणी कशाला हवी ?’, याचे उत्तर अब्दुल्ला यांनी प्रथम द्यावे !
  • ‘राममंदिर सर्वसहमतीने बनवू’, असे स्वप्न बघणारे हिंदू अब्दुल्ला यांच्या विधानानंतर तरी खडबडून जागे होतील का ?
  • हिंदूबहुल राष्ट्रात अल्पसंख्यांक समाजातील एक फुटकळ माणूस भगवान श्रीरामावर बोलतो आणि रामाच्या नावावर मते मागून सत्तेत आलेले केंद्रातील सरकार त्याचा साधा निषेधही करत नाही, हे लक्षात घ्या ! हिंदूंनो, हे विदारक चित्र पालण्यासाठी हिंदु राष्ट्राची अनिवार्यता आता तरी लक्षात घ्या !
‘राममंदिर अयोध्येतच कशाला हवे ?’ – फारुख अब्दुल्ला

नवी देहली – प्रभु रामचंद्र हे सर्वव्यापी आहेत आणि विश्‍ववंदनीय आहेत. त्यांचे मंदिर केवळ अयोध्येतच बांधले जावे, असा हट्ट कशासाठी धरला जातो, असा प्रश्‍न जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी उपस्थित केला. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

 (म्हणे) ‘नेहरूंचे योगदान आपण कसे विसरू शकतो ?’

नेहरूंविषयी बोलतांना अब्दुल्ला म्हणाले, ‘‘देशाच्या जडणघडणीतील नेहरूंच्या योगदानाविषयी प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत; पण नेहरूंचे योगदान आपण कसे विसरू शकतो ? (अखंड भारताचे तुकडे करणे, हेच गांधी-नेहरू घराण्याचे योगदान आहे आणि हिंदूंना ते कदापि मान्य नाही ! काश्मीरप्रश्‍न निर्माण करणे आणि तो चिघळवणे, हेच नेहरूंचे योगदान आहे आणि काश्मीर भारतापासून स्वतंत्र करणे, हे फारुख अब्दुल्ला यांच्या धर्मबांधवांचे स्वप्न आहे ! अशांना नेहरूंचे योगदान मोठे का नाही वाटणार ? – संपादक) इंदिरा गांधी यांनी देशासाठी जीव दिला. राजीव गांधी आणि इतर पंतप्रधान यांनी देशाच्या विकासासाठी संपूर्ण वेळ दिला. हे आपण कसे विसरतो ? आज आपण येथे आहोत, ते केवळ नेहरू आणि गांधी यांच्यामुळे.’’ ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या भाषणात ‘आई-बाप’ असे शब्द वापरणे शोभते का ?’, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. (हा सल्ला प्रचारसभेतील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई-वडिलांवर बोलणार्‍या काँग्रेस नेत्यांना अब्दुल्ला का देत नाहीत ? – संपादक)

जनता दल (संयुक्त)चे नेते पवन वर्मा यांचे अब्दुल्ला यांना रोखठोक उत्तर !

जनता दल (संयुक्त)चे नेते पवन वर्मा

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जनता दल (संयुक्त)चे नेते पवन वर्मा यांनी अब्दुल्ला यांच्या प्रश्‍नाला जोरदार प्रत्युत्तर देत त्यांनी कानउघाडणी केली. ते म्हणाले, ‘‘अयोध्या हे प्रभु श्रीरामचंद्रांचे जन्मस्थळ आहे. ‘तेथे त्यांचे मंदिर उभारण्यात चुकीचे काय आहे ? अयोध्येत राममंदिर उभारायचे कि नाही, हा प्रश्‍नच नाही. ‘ते बलपूर्वक बनवायचे, सर्वसहमतीने बनवायचे कि न्यायालयाच्या आदेशाने बनवायचे ?, हा प्रश्‍न आहे.’’ (स्वधर्मावरील आघाताला रोखठोख उत्तर देणारे पवन वर्मा यांचे अभिनंदन ! इतर हिंदूंनीही यातून बोध घ्यावा ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now