हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी रेहाना फातिमा यांना अटक

केरळ पोलिसांची १ मासानंतर कारवाई

उघडपणे दिसणार्‍या गुन्ह्यातील गुन्हेगाराला अटक करण्यासाठी एक मास घेणार्‍या केरळ पोलिसांचा कारभार किती कूर्मगतीने चालतो, हे यावरून स्पष्ट होते ! असे अकार्यक्षम पोलीस जनतेला कधीतरी कायद्याचे राज्य देतील का ?

सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा

कोची (केरळ) – हिंदूंच्या जगप्रसिद्ध शबरीमला मंदिरात बलपूर्वक घुसण्याचा प्रयत्न करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या रेहाना फातिमा या मुसलमान महिलेला पथानामथिट्टा पोलिसांनी अटक केली. ऑक्टोबर मासात शबरीमला मंदिर उघडले असतांना रेहाना फातिमा यांनी मंदिरात बलपूर्वक घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी हिंसाचार झाला होता. फातिमा यांनी लाखो हिंदु भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही त्या वेळी करण्यात आला होता. रेहाना फातिमा यांनी लिहिलेल्या ‘फेसबूक पोस्ट’द्वारे त्यांनी कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

 


Multi Language |Offline reading | PDF