छत्तीसगडमध्ये ९ नक्षलवादी ठार, तर २ सैनिक हुतात्मा

गेल्या ७१ वर्षांत एकाही सरकारला मूठभर नक्षलवाद्यांचा बीमोड करता न आल्याने पूर्वी १-२ राज्यांत सीमीत असलेला नक्षलवाद आता देशभर पसरला असून आता तर ‘शहरी नक्षलवाद’ही जन्माला आला आहे. हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !

सुकमा (छत्तीसगड) – येथे सुरक्षा सैनिक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ९ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. या चकमकीत २ सैनिक हुतात्मा झाले. (सतत नक्षलवाद्यांच्या हातून सैनिकांना मरू देणारे; पण तरीही नक्षलवादाचे उच्चाटन न करणारे सरकार राज्य करण्याच्या पात्रतेचे आहे का ? अशांना जनतेने घरचा रस्ता दाखवल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! – संपादक)

छत्तीसगड आणि तेलंगण सीमेवर नक्षलवादी लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सीमा सुरक्षा दल आणि विशेष कृती दल यांचे संयुक्त पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. किस्टाराम पोलीस हद्दीत हे पथक पोहोचताच नक्षलवाद्यांनी सैनिकांवर बेछूट गोळीबार चालू केला. या गोळीबारास सुरक्षा दलाच्या सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात ९ नक्षलवादी ठार झाले. घटनास्थळी अतिरिक्त कूमक पाठवण्यात आली आहे, अशी माहिती नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महासंचालक डी.एम्. अवस्थी यांनी दिली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now