शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ‘संस्कार’ या विषयीचे ग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !

शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांना नम्र विनंती !

‘प्रतिवर्षी डिसेंबरमध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थी त्यांचे कौशल्य आणि आवड यांनुसार गायन, नृत्य, नाट्य, एकांकिका आदी सादर करतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या सादरीकरणानुसार विविध पारितोषिके दिली जातात. त्याचप्रमाणे वर्षभरातही शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये वक्तृत्व, गायन, वादन, मैदानी खेळ आदी निरनिराळ्या स्पर्धा होत असतात. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी विविध पारितोषिके देऊन गौरवले जाते.

विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून सनातनने प्रसिद्ध केलेले ‘बालसंस्कार’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथ दिल्यास त्यांच्या मनावर सुसंस्कारांचे महत्त्व बिंबण्यास साहाय्य होईल. ‘जीवनात यशस्वी बनण्यासह गुणी अन् आदर्श होण्यासाठी काय करावे ?’, याविषयीची अमूल्य माहिती या ग्रंथांत दिली आहे. भावी पिढीसाठी ती मार्गदर्शक ठरेल.

विद्यार्थ्यांना देण्यासाठी या ग्रंथांची मागणी करायची असल्यास स्थानिक साधक अथवा नियतकालिकाचे वितरक यांना संपर्क साधावा.

साधकांंसाठी सूचना !

विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ पारितोषिक म्हणून देण्यासाठी मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांना संपर्क करा !

सर्वत्रच्या साधकांनी जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांना भेटून विद्यार्थ्यांना ‘संस्कार’ या विषयीचे आणि अन्य ग्रंथ पारितोषिक म्हणून देण्यास प्रवृत्त करावे. यापुढे शालेय किंवा महाविद्यालयीन वर्षाच्या आरंभीच असे विनंतीपत्र मुख्याध्यापकांना देण्याचे नियोजन करावे.’

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.११.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now