बार्शी (सोलापूर) येथील प्रांतीय अधिवेशनात हिंदुत्वनिष्ठांचा कृतीशील होण्याचा निर्धार !

बार्शी (जिल्हा सोलापूर) – येथील प्रांतीय हिंदु अधिवेशनाच्या कालावधीत हिंदुत्वनिष्ठांसमवेत घेतलेल्या गटचर्चांमध्ये हिंदुत्वनिष्ठांनी कृतीशील होण्याचा निश्‍चय केला. यात ४० ठिकाणी हिंदु राष्ट्र जागृती बैठका, ७ हिंदु राष्ट्र जागृती सभा, ८ परिसंवाद , ३ ज्ञातीसंघटन बैठका, ३ व्यावसायिक संघटन, २ कल्याणसंस्था संघटन, १० वक्ता प्रवक्ता शिबिरे, २ हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षक कार्यशाळा, १० साधना शिबिरे, ५ सोशलमीडिया शिबिरे, तर ‘माहिती अधिकाराचा वापर कसा करावा’ याविषयी ३ ठिकाणी शिबीर घेण्याचे निश्‍चित करण्यात आले.

अधिवेशनात समितीच्या सौ. अलका व्हनमारे, सौ. अनिता बुणगे, श्री. राजन बुणगे आणि श्री. हिरालाल तिवारी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मान्यवरांचे मार्गदर्शन

धर्मप्रेमींकडून खारूताईचा नव्हे, तर हनुमंताचा वाटा हवा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

आम्ही तर धर्मप्रेमींशी धर्मबंधुत्व जोपासणारच आहोत; पण अधिवेशनातील सर्व धर्मप्रेमींमध्ये हे धर्मबंधुत्व निर्माण व्हायला हवे. येणार्‍या काळात धर्मप्रेमींचे अभेद्य संघटन करावयाचे आहे. धर्मप्रेमींच्या मनात धर्मकार्य करण्याचा जो विचार आलेला आहे. त्याला आता कृतीची जोड देणे आवश्यक आहे. खारुताईने सेतू बांधण्यासाठी जे योगदान दिले, ते महत्त्वाचे तर होतेच, पण काळानुसार हनुमंताचा वाटा आवश्यक आहे.

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून १० सहस्र अधिवक्त्यांचे संघटन करण्याचे नियोजन आहे ! – अधिवक्ता संदीप अपसिंगेकर, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंदूंवरील अन्याय रोखण्यासाठी माहिती अधिकाराचा प्रभावी वापर करून भ्रष्टाचार, घोटाळे, अन्याय रोखू शकतो. हिंदु विधीज्ञ परिषदेने या कायद्याचा प्रभावी वापर करून अनेक देवस्थानातील भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून १० सहस्र अधिवक्त्यांचे संघटन करण्याचे नियोजन आहे.

धर्मप्रेमींचे मनोगत

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यात नियमित सहभाग घेणार ! – नागेश गंजी, सोलापूर 

नियोजन करून धर्मकार्यात सहभागी होणार. माहितीचा अधिकार कायद्याचा अभ्यासपूर्ण वापर करून यापुढे लढा देणार आहे.bसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यात नियमित सहभाग घेईन.

हिंदु विधीज्ञ परिषदेच्या मार्गदर्शनानुसार लढा दिल्याने मूळ वेतन रक्कम मिळू लागली ! – स्वप्नील सुभेदार, पंढरपूर

एका आस्थापनात काम करतांना आम्हाला मूळ वेतनापेक्षा पुष्कळ अल्प वेतन दिले जात होते; मात्र मी हिंदु विधीज्ञ परिषदेशी संपर्क साधल्यावर त्यांनी मला या अन्यायाविरोधात तक्रार नोंद करण्यासाठी बहुमूल्य मार्गदर्शन केले. तक्रारीची नोंद कामगार आयुक्तांनी घेऊन तसे निर्देश आस्थापनाच्या मालकांना दिल्याने आम्हाला पूर्ण वेतन मिळू लागले. गेली अनेक वर्षे दिवाळी बोनसही अल्प दिला जात होता, तोही योग्य मिळू लागला आणि आम्हा सर्व कामगारांचे संघटनही झाले. याचे संपूर्ण श्रेय हिंदु विधीज्ञ परिषदेलाच आहे.

समाजऋण कसे फेडावे, याविषयी अधिवेशनात मार्गदर्शन लाभले ! – अतुल कुलकर्णी, लातूर 

अधिवेशनाचे नियोजन शिस्तबद्ध होते. मातृऋण, पितृऋण आणि समाजऋण यांतील समाजऋण कसे फेडता येईल, याविषयी  अधिवेशनात मार्गदर्शन लाभले. अधिवेशनात सहभागी झाल्याने आनंद तर मिळालाच; पण योग्य दिशाही मिळाली.


Multi Language |Offline reading | PDF