राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांचे आमदारपद रहित करा !

वाई (सातारा) येथे श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानची निषेध मोर्च्याद्वारे मागणी

सातारा, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार श्री. प्रकाश गजभिये यांनी अखिल महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला. वाई (जिल्हा सातारा) येथे श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने आमदार गजभिये यांच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला. आमदार प्रकाश गजभिये आणि छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा स्वत:ला अधिक श्रेष्ठ समजणार्‍या उद्दाम नेत्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. गजभिये यांची आमदारकी रहित करण्यात यावी, त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांची हकालपट्टी करून त्यांना महाराष्ट्रबंदी करण्यात यावी, या आणि इतर मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक श्री. विनायक वेताळ यांना देण्यात आले.

या वेळी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे सर्वश्री संदीप जायगुडे, संदीप साळुंखे, गिरीधर मालुसरे, मुकुंदा पोळ, संतोष काळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. काशिनाथ शेलार, शिवसेना शहरप्रमुख श्री. गणेश जाधव, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. स्मिता भोज, सौ. सुनिता वनारसे यांसह २०० हून अधिक धारकरी उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF