गणेशोत्सव काळात ‘स्टीकर्स’ असलेल्या वाहनांनाच पथकरातून सवलत दिली ! – एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री

मुंबई, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील तसेच मुंबई-पुणे-सातारा-कोल्हापूर मार्गावरील पथकरनाक्यांवर वाहनांना पथकरातून सवलत देण्याचा निर्णय ६ सप्टेंबरला घेण्यात आला होता. त्यानुसार ज्या वाहनांना परिवहन आणि पोलीस विभाग यांच्या माध्यमातून ‘स्टीकर्स’ देण्यात आले होते, त्यांनाच पथकरातून सवलत देण्यात आली होती, असे उत्तर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पथकरामध्ये सवलत देण्याचे आश्‍वासन देऊनही गणेशोत्सव काळात पथकर आकारल्याच्या नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याविषयी २२ नोव्हेंबरला विधानसभेतील प्रश्‍नोत्तरात लेखी स्वरूपात उत्तर दिले. (पथकर सवलतीचे आश्‍वासन देतांनाच ‘स्टीकर्स’विषयीची जनजागृती करणे अपेक्षित होते !- संपादक)


Multi Language |Offline reading | PDF