‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’चे वृद्धींगत होत असलेले अध्यात्मप्रसाराचे कार्य आणि त्यास मिळत असलेला प्रतिसाद !

१. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने आयोजित केलेली व्याख्याने आणि कार्यशाळा !

१ अ. व्याख्याने आणि कार्यशाळा यांंची ठिकाणे आणि संख्या (ऑगस्ट २०१८)

२. क्षणचित्रे

२ अ. लेखाला ५५,२१२ वाचकांनी दिली भेट ! : ऑगस्ट मासात ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळावर ‘मृत झालेले कुटुंबीय आणि नातेवाईक स्वप्नात येणे’ या विषयावरील लेख प्रकाशित करण्यात आला होता. या लेखाला ५५,२१२ वाचकांनी भेट दिली. भेट देणार्‍या वाचकांमधील ही वाढ जुलै मासाच्या तुलनेत ३९ टक्के अधिक होती.

२ आ. पोर्तुगीज भाषेतील संकेतस्थळाला भेट देणार्‍यांच्या संख्येत ७८ टक्के वृद्धी ! : ऑगस्ट मासात ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या पोर्तुगीज भाषेतील संकेतस्थळाला भेट देणार्‍यांच्या संख्येत ७८ टक्के वृद्धी (जुलैतील संख्या १२,१५७ आणि ऑगस्टमधील संख्या २१,६३८) झाली.

३. विदेशात ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेली व्याख्याने आणि कार्यशाळा यांमधील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

३ अ. व्याख्याने

३ आ. कार्यशाळा

१. टोरंटो येथे एक दिवसीय आध्यात्मिक कार्यशाळेचे आयोजन : २५.८.२०१८ या दिवशी १ दिवसीय आध्यात्मिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला सौ. क्रिस्टन हार्डि आणि श्री. अ‍ॅलन हार्डि यांनी मार्गदर्शन केले. त्या वेळी ४ जिज्ञासू उपस्थित होते. उपस्थितांपैकी लीन या जिज्ञासू महिला यापूर्वी टोरंटो येथे आयोजित करण्यात आलेल्या ३ व्याख्यानांना उपस्थित होत्या, तर ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या ‘लॉग-इन’ सदस्य असलेल्या केट या जिज्ञासू यापूर्वीच्या एका व्याख्यानाला उपस्थित होत्या. या कार्यशाळेच्या कालावधीत उपस्थितांवर पुष्कळ आध्यात्मिक उपाय झाले.

२. अमेरिका आणि कॅनडा येथील जिज्ञासूंसाठी एक दिवसीय‘ऑनलाइन’ कार्यशाळेचे आयोजन : २६.८.२०१८ या दिवशी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने प्रथमच १ दिवसीय ‘ऑनलाइन’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अमेरिका आणि कॅनडा येथील ११ जिज्ञासूंनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. या कार्यशाळेला पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली, सौ. राधा मल्लिक आणि सौ. शिल्पा कुडतरकर यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित जिज्ञासूंपैकी काही जण यापूर्वी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने, तसेच ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळांना उपस्थित होते. ‘या कार्यशाळांना उपस्थित राहिल्याने जो लाभ आम्हाला मिळाला, अगदी तसाच लाभ ही कार्यशाळा ‘ऑनलाइन’ असूनही मिळाला’, असे मत जिज्ञासूंनी व्यक्त केले. या कार्यशाळेमुळे साधनेची तळमळ वाढल्याचे जिज्ञासूंनी सांगितले आणि कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल पुष्कळ कृतज्ञता व्यक्त केली.

४.‘लॉग-इन’ सुविधेच्या अंतर्गत मिळालेले अभिप्राय

४ अ.‘एस्.एस्.आर्.एफ्. इंग्रजी लॉग-इन’

४ अ १. मी संकेतस्थळावरील सर्व लेख नियमितपणे वाचत असून माझ्या शंकांचे निरसन करण्यास साहाय्य करावे ! : ‘एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाच्या संपर्कात येणेे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. या संकेतस्थळाला भेट दिल्यापासून मी त्यावरील सर्व लेख नियमितपणे वाचत आहे. त्यामुळे माझ्या मनात काही शंका निर्माण झाल्या आहेत. माझ्या शंकांचे निरसन करण्यासाठी आपण साहाय्य कराल, अशी आशा करते.’ – सौ. लुसिया जस्कोविक, जर्मनी

४ अ २. एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ आध्यात्मिक ज्ञानाने समृद्ध आहे ! : ‘यापूर्वी मी आपल्या संकेतस्थळावरील काही लेख वाचले आहेत. भविष्यात मी उरलेले सर्व लेख वाचणार आहे. आपले संकेतस्थळ आध्यात्मिक ज्ञानाने समृद्ध आहे. माहिती जालावर इतके समृद्ध आणि माहितीपूर्ण आध्यात्मिक ज्ञान देणारे दुसरे संकेतस्थळ नाही. आपण कोणतीही अपेक्षा न करता हे ज्ञान केवळ ‘ईश्‍वरीसेवा’ या भावाने जगाला देत आहात, हे विशेष आहे. या कार्यात ईश्‍वर आपल्याला साहाय्य करो !’ – सौ. अझा एल् डेसोकी, इजिप्त

४ आ. एस्.एस्.आर्.एफ्.भारत ‘लॉग-इन’ सुविधेच्या अंतर्गत व्यक्त केलेला अभिप्राय

४ आ १. नामजप आणि मीठ-पाण्याचे उपाय करणे यांमुळे पुष्कळ लाभ होत आहे ! : ‘संकेतस्थळावरील लिखाण वाचल्यानंतर मी आणि माझ्या पत्नीने प्रथम आमचे कुलदैवत ‘श्री तिरुपती बालाजी’चा, तसेच ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू केला. नामजपामुळे पुष्कळ दिवसांनी माझ्या पत्नीला परवा रात्री चांगली झोप लागली. काल रात्री २ वाजता तिला जाग आली आणि नामजप करूनही तिला झोप आली नाही. असे असले, तरी ती उत्साही होती. तिला ‘अनावश्यक काळजी करणे (एन्झायटी)’ हा आजार आहे. नामजप करू लागल्यापासून तो १० टक्के न्यून झाला आहे. तिच्यात आता आत्मविश्‍वासही परत येत आहे. आम्ही मीठ-पाण्याचे उपाय करत असून आम्हाला त्याचाही लाभ होत आहे. आम्हाला मिळालेले मार्गदर्शन, आधार आणि साहाय्य यांसाठी आम्ही उभयता परात्पर गुरु डॉ. आठवले अन् एस्.एस्.आर्.एफ्. यांचे आभारी आहोत.’

– श्री. दीपक पवार, बेंगळूरू, भारत.

५. ‘एस्.एस्.आर्.एफ्. फेसबूक’वरून मिळालेले अभिप्राय

५ अ. एस्.एस्.आर्.एफ्. इंग्रजी फेसबूक

५ अ १. एस्.एस्.आर्.एफ्.च्या प्रयत्नांमुळे लोकांच्या जीवनात चांगले पालट घडून येत आहेत ! : ‘मी ‘यू ट्यूब’वर ‘लिव्ह अ‍ॅन अवेअर लाइफ (एक सजग जीवन जगा)’ हे आपले चलच्चित्र ३ वेळा पाहिले. आपल्या प्रयत्नांमुळे लोकांच्या जीवनामध्ये चांगला पालट घडून येत आहे. ‘या कार्यासाठी आपल्याला ईश्‍वरी पाठबळ मिळावे’, अशी मी प्रार्थना करते.’ – कु. सेहरिश अली, पाकिस्तान

५ अ २. एस्.एस्.आर्.एफ्.ने ‘स्लीप पॅरालिसिस’ या त्रासावर दिलेले उपाय योग्य असून देवाचे नाव घेतल्यावर स्वतःचा त्रास पुष्कळ न्यून होत असणे : ‘मला गेली काही वर्षे ‘स्लीप पॅरालिसिस (झोपलेले असतांना जखडल्याप्रमाणे होऊन कोणतीही हालचाल करता न येणे)’ हा त्रास होत होता. (मी त्याला ‘सावलीचा राक्षस’ असे म्हणतो.) या त्रासावर आपण दिलेले उपाय योग्यच आहेत. मी देवाला प्रार्थना केल्यावर किंवा देवाचे नाव घेतल्यावर माझा हा त्रास पुष्कळ न्यून झाला. हे उपाय समजण्यापूर्वी ‘या त्रासामुळे होणार्‍या दुःखाला अंत नाही’, असे मला वाटत होतेे. ‘स्लीप पॅरालिसिस’च्या या त्रासदायक अनुभवामुळेच माझी धर्मावरील श्रद्धा दृढ झाली. मी झोपतांना आता संपूर्ण अंधार करून झोपत नाही. ‘या त्रासाच्या वेळी स्वतःचे रक्षण कसे करायचे ?’, हे  कित्येक लोकांना ठाऊक नाही. या उपायांच्या माध्यमातून तुम्ही त्यांना साहाय्य करत आहात, त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार !’ – श्री. जेसन केली, केंटकी, अमेरिका.

५ अ ३. ‘मी एस्.एस्.आर्.एफ्.’ची माहिती इतरांना सांगायला आरंभ केला आहे. खाणीत काम करणार्‍या माझ्या एका मित्राने मीठ-पाण्याचे उपाय करायला चालू केले आहेत.’ – श्री. मोर्नाह डेव्हिड, घाना, आफ्रिका.

५ आ. जर्मन फेसबूक – (‘भाववृद्धी करण्याची ५ सूत्रे’ या पोस्टवरील अभिप्राय)

५ आ १. देवाविषयीचे लिखाण वाचल्यावर पुष्कळ आनंद होऊन आंतरिक शांती जाणवणे : ‘एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केल्यापासून मी पुष्कळ आनंदी आहे. जेव्हा मी या पानावरील लिखाणाचा अभ्यास करते किंवा देवाविषयीचे लिखाण वाचते, तेव्हा मला पुष्कळ आनंद होतो आणि आंतरिक शांतीही जाणवते. त्या वेळी ‘माझ्या मनातील सर्व संभ्रम नष्ट झाले असून ईश्‍वराच्या साहाय्याने मी सर्वकाही करू शकते’, अशी श्रद्धा मला वाटते. मला देवाच्या संदर्भातील सर्वच गोष्टी पुष्कळ आवडतात आणि ‘याविना आणखी काही नको’, असे वाटते. आता मी नियमितपणे नामजप करण्याचा प्रयत्न करणार आहे.’ – कु. लिडिया कादेन, जर्मनी

५ इ. स्पॅनिश फेसबूक – एस्.एस्.आर्.एफ्. प्रकाशित करत असलेल्या प्रत्येक सूत्रावर माझा विश्‍वास आहे ! : ‘मी संकेतस्थळावरील लेख वाचत होते. काही दिवसांपूर्वी मला त्याचे फेसबूक पान असल्याचे समजले. मला अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करून सूक्ष्मातील जाणून घेण्याची क्षमता विकसित करायची आहे. एस्.एस्.आर्.एफ्. प्रकाशित करत असलेल्या प्रत्येक सूत्रावर माझा विश्‍वास आहे. मला काही अनुभूती आल्या आहेत. मला हे फेसबूक पान पुष्कळ आवडते.’ – कु. जिनोवेत फ्लोर डी ला विडा, मेक्सिको

     भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञ आहे !’

– (सद्गुरु) सिरियाक वाले, युरोप (सप्टेंबर २०१८)


Multi Language |Offline reading | PDF