अखिल मानवजातीला अध्यात्मजगताची नाविन्यपूर्ण ओळख करून देणार्‍या सनातन संस्थेच्या ध्वनीचित्रीकरणाशी संबंधित सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात आपले योगदान द्या !

साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या रामनाथी आश्रमात चालू झालेली ‘ध्वनीचित्रीकरणाची सेवा’ म्हणजे, हिंदु धर्म आणि संस्कृती, तसेच आध्यात्मिक संशोधन यांची अद्वितीय ओळख करून देणारे अनमोल ज्ञानभांडार ! विविध साधनामार्गांनी साधना केलेल्या संतांचा साधनाप्रवास उलगडणार्‍या मुलाखती, हिंदु आचार आणि धार्मिक कृती करण्याच्या योग्य पद्धती आणि त्यांमागील शास्त्र, वर्ष २०२३ मध्ये स्थापन होणारे हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी देवाने उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला घातलेल्या दैवी बालकांच्या मुलाखती अशा नानाविध नाविन्यपूर्ण विषयांवरील ध्वनीचित्रीकरण आणि त्या अंतर्गत विविध सेवा सध्या चालू आहेत.

आध्यात्मिक संशोधनासाठी उपयुक्त असे ध्वनीचित्रीकरण करणे, हे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. देश-विदेशांतील तीर्थक्षेत्रे, संतांची समाधीस्थाने, ऐतिहासिक स्थळे आदींचे माहात्म्य, तसेच त्यांविषयीचे आध्यात्मिक संशोधन; वाईट शक्ती आणि त्यांच्या त्रासांवरील उपाय यांविषयीचे संशोधन; दैवी शक्ती आणि वाईट शक्ती यांचा दृश्य परिणाम दर्शवणारे संशोधन; सात्त्विक संगीत, नृत्य, वाद्यवादन अशा कलांच्या संदर्भात केलेले संशोधन अशा विविधांगी नाविन्यपूर्ण संशोधनाचे पैलू उलगडणे या ध्वनी-चित्रीकरणामुळे शक्य होत आहे.

ध्वनीचित्रीकरणाच्या माध्यमातून संग्रहित होत असलेल्या या ज्ञानाला अद्वितीय ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्य आहे. हे ज्ञान म्हणजे भावी काळात १४ विद्या आणि ६४ कला यांचे शिक्षण देणार्‍या ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’चा पायाच आहे.

ध्वनीचित्रीकरणाशी संबंधित सेवा करणार्‍यांना विविध सेवांतून जगाला अध्यात्मजगताची अभिनव ओळख होईल, तसेच ज्ञानाचा एक निराळा आनंदही अनुभवायला मिळेल. १ – २ वर्षांत महाभीषण आपत्काळाला हळूहळू आरंभ होणार आहे. त्यापूर्वीच हे सारे ज्ञानभांडार अखिल मानवजातीपर्यंत पोहोचवायचे आहे. त्यासाठी सेवा करणे, ही श्रेष्ठ अशी समष्टी साधनाच आहे. ही साधना करून शीघ्र ईश्‍वरप्राप्ती करून घेऊया !

हे सारे कार्य शीघ्रतेने होण्यासाठी मनुष्यबळाची तातडीने आवश्यकता आहे. आपण आपली आवड आणि कौशल्य यांनुसार पुढे दिलेल्या सेवा शिकू शकता.  पुढीलपैकी काही सेवा आश्रमात राहून शिकल्यास नंतर घरी राहूनही करता येतील. या अंंतर्गत असणार्‍या सेवा पुढीलप्रमाणे आहेत.

१. विविध उपलब्ध सेवा

१ अ. चित्रीकरण (शूटिंग)

१. चित्रीकरण आणि ध्वनीमुद्रण (रेकॉर्डिंग) करणे

२. चित्रीकरणाच्या वेळी प्रकाशयोजना, नेपथ्य आदींसाठी साहाय्य करणे

३. चित्रीकरणाच्या नोंदी आणि चित्रीकरणाचे वर्गीकरण करणे

१ आ. छायाचित्रे काढणे (फोटोग्राफी)

१. छायाचित्रे काढणे

२. १,७४,००० हून अधिक छायाचित्रांना विषयानुसार संकेतांक (कोड) देणे

३. १ लाखहून अधिक छायाचित्रांचे विषयवार वर्गीकरण करणे आणि त्यांतील आवश्यक नसलेली छायाचित्रे पुसणे

१ इ. चित्रीकरणाचे संकलन (एडिटिंग) करणे

१. ४०० हून अधिक विषयांवरील चित्रीकरणाचे संकलन, तसेच ध्वनीसंतुलन (ऑडिओ बॅलन्सिंग) करणे

२. ४०० हून अधिक ध्वनीचित्र-चकत्यांची (‘व्हिसीडीं’ची) तांत्रिकदृष्ट्या पडताळणी करणे

३. प्रतिमास १०० हून अधिक छायाचित्रे ध्वनीचित्र-चकतीत घेण्यायोग्य करण्यासाठी ‘फोटोशॉप’मध्ये सेवा करणे

४. संगणकावर सूक्ष्म ज्ञानाविषयीची चित्रे आणि अन्य चित्रे सिद्ध करणे

१ ई. विविध विषयांवरील संहिता लिखाण (स्क्रिप्ट राइटिंग) करणे

१. संहितेसाठी आवश्यक गोष्टी (उदा. माहिती, छायाचित्रे, ग्रंथ) एकत्र करणे

२. ५०० हून अधिक विषयांवरील संहिता लिहिणे

३. संकलित झालेले ध्वनीचित्रीकरण पडताळणे

४. संहितेचे आवश्यकतेनुसार अन्य भाषांमध्ये भाषांतर करणे

१ उ. ध्वनीचित्रफितींतील (‘कॅसेट’मधील) चित्रीकरण (फूटेज) यांसंदर्भातील सेवा

१. २,००० हून अधिक ध्वनीचित्रफितींतील चित्रीकरण संगणकात घेऊन ते नीट आले असल्याचे पडताळणे

२. २०,००० हून अधिक घंट्यांच्या चित्रीकरणाची आवश्यक ती माहिती इंग्रजी भाषेत टंकलिखित करणे

३. २०,००० हून अधिक घंट्यांच्या चित्रीकरणाचे विषयानुरूप वर्गीकरण करून त्यांना संकेतांक देणे

१ ऊ. अन्य सेवा

१. चित्रीकरणाच्या साहित्याची देखभाल करणे आणि त्यांची आवक-जावक पहाणे

२. ध्वनीचित्र-चकत्यांची आवक-जावक पहाणे

३. ध्वनीचित्र-चकत्यांचा संग्रह (लायब्ररी) सांभाळणे

४. चित्रीकरण आणि संकलन यांच्याशी संबंधित असलेल्या उपकरणांची देखभाल अन् दुरुस्ती करणे

जे साधक, तसेच वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी व्यवसाय म्हणून ‘व्हिडिओ एडिटिंग’ अथवा तत्सम तांत्रिक कामे करतात, तेही स्वतःचा व्यवसाय सांभाळून या धर्मसेवेसाठी आपले विनामूल्य योगदान देऊ शकतात. ही सेवा करण्यास इच्छुक असलेल्यांना सेवा उपलब्ध करून देण्यात येईल.

वरील सेवा करू इच्छिणार्‍यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून पुढील सारणीनुसार आपली माहिती सौ. भाग्यश्री सावंत यांच्या नावे [email protected] या संगणकीय पत्त्यावर अथवा पुढील टपाल पत्त्यावर पाठवावी.

टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’

सनातनच्या आश्रमांतील पुढील सेवांतही सहभागी होऊ शकता !

‘सनातनच्या आश्रमांत पुढील सेवांसाठीही साधकांची आवश्यकता आहे – ग्रंथ, कला, दैनिक, संकेतस्थळ, संगणक-दुरुस्ती, वैद्यकीय, बांधकाम, धान्य, स्वयंपाकघर आणि बेकरी या सेवांविषयीची सविस्तर माहिती वेळोवेळी ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध केली जात आहे. वरील सेवांमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेल्यांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर स्वत:ची माहिती कळवावी. यात काही शंका असल्यास सौ. भाग्यश्री सावंत यांना ७०५८८८५६१० या क्रमांकावर विचाराव्यात.


Multi Language |Offline reading | PDF