नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबईमधील २६ चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्या चालवणार्‍यांवर प्रशासनाने आकारला दंड !

नियमांचे उल्लंघन करून जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या चायनीज गाड्यांवर प्रशासनाने कायमचीच बंदी घालावी !

मुंबई, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून मुंबईमधील ५६ चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्यांची पडताळणी करण्यात आली. यामध्ये नियमांचे उल्लंघन करणार्‍या २६ चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्या चालवणार्‍यांकडून प्रशासनाने १ लाख ४८ सहस्र ५०० रुपयांचे तडजोड शुल्क आकारण्यात आल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी २० नोव्हेंबर या दिवशी विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्‍नावर लेखी स्वरूपात दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण पावसकर यांसह अन्य सदस्यांनी चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर विक्री करण्यात येणार्‍या दूषित खाद्यपदार्थांचे सूत्र उपस्थित करून कारवाईविषयी माहिती मागितली होती.

याविषयी गंभीर सूत्र म्हणजे ऑगस्ट २०१८ मध्ये शिवडी येथे एका चायनीज खाद्यपदार्थाच्या गाडीवर रोगट आणि दूषित दर्जाचे मांस आढळले होते. बापट यांनी या प्रकरणी दोषींच्या विरोधात महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटला चालू असल्याचे सांगितले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now