पाकने भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील अधिकार्‍यांना गुरुद्वारामध्ये जाण्यापासून रोखले !

  • भारताच्या परराष्ट्रनीतीचे धिंडवडे ! पाक भारताची कुरापत काढण्याची एकही संधी सोडत नाही. पाकने कितीही कुरापती काढल्या, तरी भारत त्यास धडा शिकवत नाही ! असे किती दिवस चालू द्यायचे ? ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • पाकने भारताचा एवढा अवमान करूनही भाजप सरकार पाकचा शाब्दिक निषेध व्यक्त करण्यापलीकडे काही करणार नाही, हे जाणा ! पाकसारख्या शत्रूला वठणीवर आणण्यासाठी इस्रायली बाणाच आवश्यक !  

लाहोर – पाकने तेथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील २ अधिकार्‍यांना तेथील गुरुद्वारामध्ये जाण्यास मज्जाव केला. अरनजीत सिंह आणि सुनील कुमार अशी या अधिकार्‍यांची नावे आहेत. या घटनेच्या एक दिवस आधी पाकने गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त भारतीय यात्रेकरूंच्या सोयीसाठी त्याच्या भूमीत असलेल्या करतारपूर ‘कॉरिडॉर’ उघडे केले होते. त्याच्या दुसर्‍याच दिवशी भारतीय अधिकार्‍यांना तेथे जाण्यापासून रोखल्याने पाकचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. पाकने यापूर्वीही तेथील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया आणि त्यांची पत्नी यांना रावळपिंडीतील गुरुद्वारा पंजा साहिब येथे जाण्यापासून रोखले होते.

पाकने करतारपूर ‘कॉरिडॉर’ उघडे केल्यावर अरनजीत सिंह आणि सुनील कुमार हे २१ नोव्हेंबरच्या रात्री गुरुद्वारा ननकाना साहिब अन् २२ नोव्हेंबरला गुरुद्वारा सच्चा सौदा येथे गेले होते. तथापि पाकने या दोन्ही अधिकार्‍यांना तेथे जाण्यापासून रोखले.

भारताकडून (केवळ) विरोध !

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील पाकच्या दूतावासातील अधिकारी सैयद हैदर शाह यांना बोलवून घेत पाकच्या कृतीस विरोध दर्शवला. भारताने सांगितले की, अरनजीत सिंह आणि सुनील कुमार या दोन्ही भारतीय अधिकार्‍यांना पाककडून गुरुद्वारामध्ये जाण्याची अनुमती मिळाली होती. पाकने त्यांना रोखल्यामुळे परतावे लागले.


Multi Language |Offline reading | PDF