जॉन चाऊ हे आदिवासींमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार (म्हणजेच धर्मांतर) करण्यासाठीच गेल्याचे त्यांच्या नोंदवहीतून स्पष्ट

अंदमान येथे चाऊ यांची हत्या झाल्याचे प्रकरण

पर्यटनाच्या नावाखाली विदेशी ख्रिस्ती धर्मप्रसारक भारतात येऊन हिंदूंचे धर्मांतर करतात, तरी सरकार आणि सुरक्षायंत्रणा यांना त्याचा थांगपत्ता लागत नाही. यावरून सुरक्षायंत्रणा किती ढिसाळ आहे, हे लक्षात येते ! असे सरकार हिंदूंचे धर्मांतर कधीतरी रोखील का ?

अशांना भाजप सरकारने ‘व्हिसा’ देणे म्हणजे हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी एकप्रकारे अनुमती देणे होय !

अमेरिकी ईसाई धर्म प्रचारक जॉन एलन चौ

अंदमान – अंदमान द्वीप येथे हत्या झालेले अमेरिकेतील ख्रिस्ती धर्मप्रसारक जॉन अ‍ॅलेन चाऊ हे द्वीपावरील आदिवासींमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार (म्हणजेच धर्मांतर) करण्यासाठीच गेले होते, असे त्यांच्या नोंदवहीतील नोंदीतून स्पष्ट झाले आहे. अंदमानमधील सेंटिनल बेटावरील आदिवासींमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी गेलेले जॉन चाऊ यांची आदिवासींनी २० नोव्हेंबर या दिवशी हत्या केली. चाऊ हे पर्यटक म्हणून भारतात येत असत अन् येथे ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत, असेही उघड झाले आहे. ते यापूर्वी ५ वेळा सेंटिनेल बेटावर येऊन गेले आहेत.

१४ नोव्हेंबरला झाले होते आक्रमण !

यापूर्वी चाऊ यांनी १४ नाव्हेंबरला सेेंटिनल बेटावर जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी बेटावरील आदिवासी समाजातील काही लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; मात्र चाऊ यांना पहाताच बेटावरील आदिवासी चांगलेच संतापले. त्यांनी जॉनच्या दिशेने एक तीक्ष्ण बाणही सोडला. हा बाण चाऊ  यांच्या हातात असलेल्या बायबलला लागला. यानंतर चाऊ यांनी हा प्रसंग त्यांच्या नोंदवहीत ‘माझ्या हातात असलेल्या बायबलमुळे माझे प्राण वाचले’, अशा शब्दांत लिहून ठेवला आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना ‘माझी हत्या झाल्यास त्या आदिवासींना क्षमा करा’, असे सांगून ठेवले होते.

इंडियन कोस्ट गार्ड ने घेतलेले सेंटिनली आदिवासींचे घेतलेले दुर्मिळ छायाचित्र

१५ नोव्हेंबरला पुन्हा बेटावर !

जॉन चाऊ यांनी १५ नोव्हेंबर या दिवशी पुन्हा एकदा बेटावर जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना बेटाजवळ पहाताच आदिवासींनी त्यांच्यावर आक्रमण केले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. काही मासेमारांनी त्यांचा मृतदेह तरंगतांना पाहिल्यावर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.


Multi Language |Offline reading | PDF