सीएन्एन् वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने पुन्हा अयोग्य वर्तन केल्यास त्याला बाहेर फेकले जाईल ! – डोनाल्ड ट्रम्प

कुठे प्रसारमाध्यमांवर निर्बंध लादता येणार नसल्याचे सांगणारे केंद्रातील हतबल भाजप सरकार, तर कुठे पत्रकारावर वचक बसवणारी कारवाईची चेतावणी देणारे अमेरिकेतील ट्रम्प सरकार !

कॅलिफोर्निया – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि प्रसारमाध्यमे यांच्यात सातत्याने खटके उडत असतात. आता त्यांनी सीएन्एन् वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशी झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर ‘त्या’ पत्रकाराने पुन्हा अयोग्य वर्तन केल्यास त्याला बाहेर फेकले जाईल’, असे एका मुलाखतीच्या दरम्यान म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी सीएन्एन् वृत्तवाहिनीचे पत्रकार जिम अकोस्टा यांनी ट्रम्प यांना पत्रकार परिषदेत प्रश्‍न विचारला होता. त्या वेळी ट्रम्प आणि अकोस्टा यांच्यात वाद झाल्याने अकोस्टा यांचे अनुज्ञप्तीपत्र (प्रेस पास) निलंबित करून इतर बैठकांमध्ये भाग घेण्यासही त्यांच्यावर बंदी घातली होती. या संदर्भात एका मुलाखतीत ट्रम्प यांना प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी वरील उत्तर दिले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now