शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वनाधिकार्‍यांच्या तोंडाला राख फासली

अंबरनाथ येथील झाडांना आग लावल्याचे प्रकरण

१ लाख झाडांकडे दुर्लक्ष करणार्‍या वनविभागाचे दायित्वशून्य अधिकारी तत्परतेने निलंबित व्हायला हवेत ! वने नष्ट होत असतांना कोणी झाडे लावत असतील, तर त्याची देखभालही करू न शकणारे वन खाते काय कामाचे ?

ठाणे, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – अंबरनाथ येथील मांगरूळ येथे शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या झाडांकडे वन विभागाने दुर्लक्ष केल्याने काही समाजकंटकांनी या झाडांना आग लावल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या घटनेचा जाब विचारण्यासाठी तसेच याचे दायित्व असलेल्या वनअधिकारी आणि समाजकंटक यांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयावर शिवसेनेने धडक मोर्चा काढला होता. या वेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या देखत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वनाधिकार्‍यांच्या तोंडाला राख फासली, तसेच कुंड्या फेकून निषेध केला. या प्रकरणी खासदार शिंदे यांच्यासह काही शिवसैनिकांना कह्यात घेण्यात आले आहे.

शिवसेना आणि विविध सामाजिक संस्थांनी लोक सहभागातून मांगरूळ येथे लावलेली १ लाख झाडे वन अधिकार्‍यांच्या दायित्वशून्यतेमुळे नष्ट झाली आहेत. वन विभागाने या झाडांकडे लक्ष न दिल्याने समाजकंटकांनी येथे आग लावून ही झाडे पेटवून दिली आहेत.


Multi Language |Offline reading | PDF