अमेरिकेत नाईट क्लबमधील प्रसाधनगृहात हिंदु देवतांची चित्रे !

हिंदु महिलेच्या विरोधानंतर ‘डिझायनर’कडून क्षमायाचना

अमेरिकेशी असंख्य करार करणारे केंद्रातील ‘हिंदुत्वनिष्ठ’ भाजप सरकार हिंदु देवतांच्या या अवमानाविषयी अमेरिकेला खडसावणार का ? हिदूंनो, तुमच्या देवतांचे असे अश्‍लाघ्य विडंबन पुन्हा कोणीही करू धजावणार नाही, अशी स्वतःची पत निर्माण करा !

न्यूयॉर्क – येथील एका नाईट क्लबमधील अतीमहनीय व्यक्तींसाठी असलेल्या प्रसाधनगृहातील भिंतींवर श्री सरस्वतीदेवी, श्री दुर्गादेवी, श्री कालीमाता, भगवान शिव आणि श्री गणेश या देवतांची चित्रे लावून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. यावर अमेरिकेतील ओहियो राज्यात रहाणार्‍या अंकिता मिश्रा नावाच्या एका हिंदु महिलेने तीव्र आक्षेप घेत विरोध दर्शवला. (देवतांच्या अवमानाच्या विरोधात तत्परतेने कृती करणार्‍या अंकिता मिश्रा यांचे अभिनंदन ! इतर हिंदूंनीही यातून बोध घ्यावा ! – संपादक) यानंतर प्रसाधनगृहाच्या ‘डिझायनर’ने ‘ते माझे सांस्कृतिक अज्ञान होते’, असे सांगत क्षमायाचना केली. (सांस्कृतिक अज्ञान मुसलमान किंवा ख्रिस्ती धर्माच्या संदर्भात कसे नसते ? यावरून अमेरिकेतील लोकांचा हिंदुद्वेष दिसून येतो ! – संपादक)

(हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

याविषयी अंकिता मिश्रा यांनी त्यांचे अनुभव ‘फेसबूक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक प्रसारमाध्यमांवर सांगितल्यानंतर ही गोष्ट उघड झाली. त्यांनी ‘इन्स्टाग्राम’वर सदर नाईट क्लबच्या विरोधात ‘माय कल्चर इज नॉट यूअर बाथरूम’ असा ‘हॅशटॅग’ वापरून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now