छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांची ८ धर्मग्रंथांवर हात ठेवून भाजपला पाठिंबा न देण्याची शपथ !

सत्तेसाठी असे स्वार्थी आणि रंगबदलू लोकप्रतिनिधी काहीही करू शकतात, हे यावरून लक्षात येते ! असे लोकप्रतिनिधी देणारी लोकशाही निरर्थकच !

रायपूर (छत्तीसगड) – ‘मी मरण पत्करीन; पण फॅसिस्टवादी आणि जातीयवादी भाजपला पाठिंबा देणार नाही’, अशी शपथ काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले आणि ‘जनता काँग्रेस’ नावाचा पक्ष स्थापन केलेले अजित जोगी यांनी ८ धर्मग्रंथांवर हात ठेवून घेतली. जोगी यांनी एक दिवस आधीच ‘छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत बहुमत न मिळाल्यास भाजपला पाठिंबा देईन’, असे म्हटले होते.

शपथ घेतांना जोगी यांनी भगवद्गीता, कुराण, रामायण, संत कबीर यांचा ग्रंथ, बायबल, शदानी प्रकट, गुरुग्रंथ आणि सतनाम दर्शन या ग्रंथांवर हात ठेवला होता. ‘बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि जनता काँग्रेस या पक्षांची आघाडी राज्यात सत्ता स्थापन करू शकते. केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध असले, तरी मी भाजपला पाठिंबा देण्याची कल्पनाही करू शकत नाही’, असेही अजित जोगी यांनी म्हटले आहे.


Multi Language |Offline reading | PDF