बंगालमध्ये गोरक्षणासाठी ‘सेल्फी विथ गोमाता’ स्पर्धा

कोलकाता – बंगालमध्ये गोरक्षणासाठी काही तरुणांनी ‘गोसेवा परिवार’च्या माध्यमातून ‘सेल्फी विथ गोमाता’ (भ्रमणभाषमधून गोमातेसह स्वत:चे छायाचित्र काढणे) ही स्पर्धा आयोजित केली आहे. हे तरुण राज्यभर लोकांना गायींमुळे होणारे फायदे आणि गायी विकल्याने होणारे तोटे सांगून जागरूक करण्याचे काम करत आहेत. गायींमुळे होणारे आर्थिक लाभही ते लोकांना समजावून सांगत आहेत.

गोरक्षणाच्या नावाखाली होणार्‍या हिंसेवरही तरुणांनी टीका केली आहे. ‘गोसेवा परिवार’च्या श्री. ललित अग्रवाल यांनी सांगितले, ‘‘गोरक्षणासाठी हिंसा होणे योग्य नाही. त्याबाबत आम्ही ‘गोसेवा परिवार’च्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करत आहोत. प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांना भेटून गोपालनाचे महत्त्व, आर्थिक लाभ सांगत आहोत. गायींची विक्री केल्याने आर्थिक हानी होते, हे त्यांना पटवून देत आहोत. हे सगळे करत असतांना आम्ही हिंसेचा मार्ग अवलंबला नाही किंबहुना त्याची आवश्यकताच नाही.’’

‘गेल्या वर्षी ’सेल्फी विथ गोमाता’ या स्पर्धेत १० सहस्रांहून अधिक जणांनी भाग घेतला होता. यावर्षी ‘व्हॉट्सअ‍ॅप’, ‘ट्विटर’ आणि ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी प्रवेश स्वीकारले जातील. गोरक्षणासंबंधी लोकांना जागरूक करणे आणि गोपालनाचे महत्त्व लोकांना पटवून सांगणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे,’ अशी माहिती आयोजक श्री. अभिषेक सिंह यांनी दिली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now