भारत ‘रोमियो’ हेलिकॉप्टर्सची खरेदी करणार

वॉशिंग्टन (अमेरिका) – संरक्षणाची शक्ती वाढवण्यासाठी भारत अमेरिकेकडून २४ ‘अ‍ॅन्टी सबमरिन’ ‘रोमियो’ हेलिकॉप्टर्सची खरेदी करणार आहे. याविषयी भारताने अमेरिकेसह पत्रव्यवहार केला आहे. यामुळे हिंदी महासागर क्षेत्रात चीनवर अंकुश ठेवण्यास भारताला साहाय्य होणार आहे. ही अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स केवळ अमेरिकेकडे उपलब्ध आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेंस यांची सिंगापूर येथे झालेल्या द्विपक्षीय चर्चेत यांविषयी चर्चा करण्यात आली होती. अमेरिकेकडून २४ हेलिकॉप्टर्स खरेदी केल्यानंतर १२३ हेलिकॉप्टर्सची भारतात निर्मिती करण्याची योजना आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now