माझी साक्ष नोंदवायची असेल, तर अँटिग्वाला या ! – मेहूल चोक्सीचा उद्दामपणा

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचे प्रकरण

पोलिसांनी वेळीच आरोपींच्या मुसक्या आवळल्या असत्या, तर त्यांना आरोपींकडून अशी उद्दामपणाची भाषा ऐकावी लागली नसती !

नवी देहली – पंजाब नॅशनल बँकेतील १३ सहस्र कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी पसार असलेला आरोपी मेहूल चोक्सी याने ‘मी आजारी आहे. अंमलबजावणी संचालनालयाला माझी साक्ष नोंदवायची असेल, तर त्यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे घ्यावी अथवा अँटिग्वाला यावे’, असे सांगितले. या घोटाळ्याच्या प्रकरणी मुंबई येथील न्यायालयात सुनावणी चालू असून चोक्सीने त्याच्या अधिवक्त्यांच्या वतीने न्यायालयाला हे सांगितले. पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याच्या प्रकरणी मेहूल चोक्सीला आर्थिक गुन्हेगार ठरवून त्याला पसार घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर चोक्सीच्या अधिवक्त्याने न्यायालयात त्याची बाजू मांडली. अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वीच चोक्सीची २१८ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF