समष्टी साधना केल्याने अहं अल्प होऊन व्यापकत्व निर्माण होते ! – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात आयोजित युवा साधक प्रशिक्षण शिबीर

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

रामनाथी (गोवा) – समष्टी साधना करतांना ‘मी साधनेत कुठे अल्प पडत आहे’, हे समजते अन्यथा ‘माझे साधनेचे सर्व प्रयत्न चांगले चालू आहेत’, या विचाराने स्वत:च्या कोषात राहिल्यामुळे अहंमध्ये वृद्धी होते. समष्टीत साधना करतांना विविध माध्यमातून ईश्‍वर शिकवत असल्याने व्यापक होता येते, तसेच अहं अल्प होण्यास साहाय्य होते. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नसल्याने शक्य तेवढी सेवा करायला हवी, असे मार्गदर्शन सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी युवा साधकांना केले.

येथे ११ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत युवा साधक प्रशिक्षण शिबीर उत्साही वातावरणात पार पडले. शिबिराच्या कालावधीत युवा साधकांना धर्माचरणाचे महत्त्व, साधनेतील भावजागृतीचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन अन् सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देण्यात आली.

शिबिरात झालेल्या गटचर्चांद्वारे ‘स्वभावदोेष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेसाठी स्वभावदोषांची सूची कशी काढावी ?’, ‘स्वयंसूचना कशा सिद्ध कराव्यात ?’, तसेच ‘स्वभावदोषांची सारणी कशी लिहावी ?’, ‘सामाजिक माध्यमांद्वारे धर्मप्रसार कसा करावा ?’, ‘वृत्तसंकलन कसे करावे ?’, या विषयांवरील तात्त्विक आणि प्रायोगिक सत्रे घेण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF