नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ ७५ रुपयांचे नाणे लवकरच चलनात येणार

क्रांतीकारकांचे केवळ स्मरण न करता त्यांच्याप्रमाणे देशभक्त होऊन कृतीही करायच्या असतात. तसे केले, तरच त्यांचे स्मरण करण्याला अर्थ आहे, अन्यथा तो केवळ सोपस्कार होईल !

नवी देहली – नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे तिरंगा झेंडा फडकावण्याला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. या निमित्ताने नेताजींच्या स्मरणार्थ ७५ रुपयांचे नवे नाणे चलनात येणार आहे. यासंबंधी अर्थ मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे. या नाण्याचे वजन ३५ ग्रॅम असेल. नाण्याची निर्मिती चालू असून त्यात ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, निकेल आणि जस्त प्रत्येकी ५ टक्के या प्रमाणात वापरण्यात येणार आहे.

नाण्यावर सेल्युलर कारागृहासमोर तिरंगा फडकावणारे नेताजी बोस यांचे चित्र असून त्या खाली ३० डिसेंबर १९४३ असा उल्लेख असणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २१ ऑक्टोबर या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करून लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now