टिपू सुलतानमुळे अय्यंगार कुटुंबात आजही दिवाळी नाही ! – मैसूरूच्या महाराणी राजमाता प्रमोदादेवी

क्रूरकर्मा टिपू सुलतानप्रेमींना याविषयी काय म्हणायचे आहे ?

बेळगाव – टिपू सुलतानने मैसूरू संस्थानाला त्रास दिला होता, हे तर खरे आहे. याशिवाय त्याने ऐन दिवाळीत होमहवन करणार्‍या अय्यंगार कुटंबांतील शेकडो व्यक्तींची हत्या केली होती. हा इतिहास आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आजही अनेक अय्यंगार कुटुंबे दिवाळी साजरी करत नाहीत. आता सरकारने त्याची जयंती करावी कि नाही ?, हा त्यांचा प्रश्‍न आहे, असे उद्गार मैसूरू राजघराण्यांच्या राणीसाहेब तथा राजमाता प्रमोदादेवी यांनी पत्रकारांशी बोलतांना काढले. त्या नुकत्याच येथील एका खासगी कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

टिपू सुलतान जयंतीच्या संदर्भात निर्माण झालेल्या वादावर विचारले असता राजमाता प्रमोदादेवी म्हणाल्या, ‘‘मैसूरूच्या राजघराण्याला टिपू सुलतानमुळे बरेच त्रास झालेले आहेत. मैसूरू संस्थान म्हणजेच जनतेलाही या त्रासांचा सामना करावा लागला आहे. यामुळेच आमच्या पूर्वजांनी आम्हाला अशा लोकांपासून दूर रहा, अशी सूचना केली आहे. तरीही सरकार कोणत्या आधारावर टिपू सुलतान जयंती करू पहात आहे, हे आपल्याला माहिती नाही. आम्ही टिपू जयंतीला विरोधही करत नाही आणि स्वागतही करत नाही. आम्हाला कोणत्याही निवडणुकीत सहभागी व्हायचे नाही. जनतेचे कल्याण करण्यासाठी राजकारणच केले पाहिजे, असे काही नसून राजकारणाविरहित जनसेवा करण्यात आपल्याला रस आहे; मात्र सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीत सहभागी करून घेण्यासाठी आपल्याशी संपर्क साधला आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF