केरळ येथील ननवर बलात्कार करणार्‍या बिशपला धडा शिकवण्याचे धैर्य तृप्ती देसाई यांनी दाखवावे ! – सौ. नयना भगत, सनातन संस्था

तृप्ती देसाई यांचा शबरीमला मंदिरात जाण्याचा नवा ‘स्टंट’

मुंबई, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – तृप्ती देसाई या स्वतःला कायदा मानणार्‍या आणि देवाचे भक्त म्हणवतात; हा सर्वांत मोठा विनोद आहे. ज्या तृप्ती देसाई संविधानाचा आदर करण्याच्या गप्पा मारतात, त्याच मंदिराच्या विश्‍वस्तांना चोप देऊ, अशा घोषणा करतात. ज्या भक्तीचा ‘स्टंट’ करतात, त्याच अन्यांच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा, तसेच धर्मपरंपरांचा अपमान करतात. केवळ इतकेच नव्हे, तर त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी पुणे येथे एका व्यक्तीला मारहाण करून जातीवाचक शब्द वापरल्याच्या प्रकरणी ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा आणि त्या व्यक्तीकडील सोन्याची साखळी, २७ सहस्र रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयानेही त्यांचा जामीन नाकारला आहे. अशा गुंडगिरी आणि जातीयता पसरवणार्‍या तृप्ती देसाई आता हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी आणि केरळ येथील धार्मिक सलोखा बिघडवण्यासाठी शबरीमला मंदिरात जाण्याचा ‘स्टंट’ करायला निघाल्या आहेत. जर त्यांना केरळमधील शबरीमला मंदिरात जाऊन ‘मंदिरप्रवेश न मिळाल्याने महिलांवर होणारा कथित अन्याय’ दूर करायचा असेल, तर त्यांनी प्रथम केरळ येथील बलात्कार पीडित ननला भेटावे, तिला सहानुभूती दाखवावी आणि तिच्यावर बलात्कार करणार्‍या बिशप फ्रँको मुलक्कल याला धडा शिकवण्याचे धैर्य दाखवावे. तर खर्‍या अर्थाने महिलांवरील अन्यायाच्या विरोधात तृप्ती देसाई कार्य करतात, असे म्हणता येईल, असे सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी म्हटले आहे.

तृप्ती देसाई यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाचा चौथरा, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर आणि श्री महालक्ष्मी मंदिर येथे गर्भगृहात महिलांच्या प्रवेशबंदीवरून असलेली परंपरा मोडीत काढून धर्मद्रोह केला आहे; मात्र न्यायालयाने निर्णय जरी दिला असला आणि तृप्ती देसाईंसारखे कथित पुरोगामित्वाच्या नावाखाली कार्य करणारे धर्मद्रोही परंपरा तोडत असतील, तरी धर्मश्रद्ध माता-भगिनी या आजही भक्तीभावाने धर्मपरंपरांचे पालन करतात, हा श्रद्धेचा विजयच आहे, असेही सौ. भगत यांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF