(म्हणे) ‘शहरांची नावे पालटल्याने बेरोजगारीची समस्या सुटणार आहे का ?’- शरद पवार

बेरोजगारीची समस्या आणि शहरांची नावे पालटणे हे दोन भिन्न विषय आहेत. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करून अस्मिताशून्य निधर्मी नेत्यांना केवळ मुसलमानांचाच अधिक कळवळा असल्याने मतांच्या गोळाबेरजेसाठी त्यांनी शहरांची नावे पालटण्याचे सूत्र कायमच दुर्लक्षित केले ! नामांतराच्या सूत्रावरून आपली पारंपारिक मतपेढी जपण्याचा पवार यांचा केविलवाणा आटापिटा !

मुंबई – शहरांची नावे पालटल्याने बेरोजगारीची समस्या सुटणार आहे का? देशातील समस्यांकडे दुर्लक्ष करून त्यावरील लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे. सत्ताधारी लोकांना चुकीच्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, देशातील नागरिकांनी पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन पुढे जायला हवे; पण आज जातीजातींमध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे आणि गावागावांत चुकीचे संदेश पोहोचवण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे देशात आज भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. (जातीपातीचे राजकारण करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसने असे म्हणणे हास्यास्पद ! – संपादक) मुसलमान समाज ‘मशिदीचा विषय काढू नका. आम्ही मंदिराच्या विरोधात नाही. आमचा न्यायालयावर विश्‍वास असून न्यायालय जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू’, असे ते सांगत आहे, तर सत्ताधारी अयोध्येमध्ये राम मंदिर बनवायला चालले आहेत. (अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन हाच पक्षाचा अजेंडा असणार्‍यांकडून वेगळी अपेक्षा ती काय करणार ? – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now