पंजाबमध्ये ‘जैश-ए-महंमद’चे ७ आतंकवादी घुसले : अतीदक्षतेची चेतावणी

  • आतंकवादग्रस्त भारत ! कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेत आले, तरी ते आतंकवाद्यांची घुसखोरी रोखू शकत नाही, ही वस्तूस्थिती आहे. मूठभर आतंकवाद्यांना वेळीच ठार न करता केवळ वरवरची कारवाई करण्यासाठी लाखो कोटी रुपये व्यय करणारा, तसेच सैन्याचा बहुमूल्य वेळ वाया घालवणारा जगातील एकमेव देश भारत !
  • आतंकवाद्यांची घुसखोरीही रोखू न शकणारे सरकार त्यांचा निःपात कधी करील का ? यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुकरण करणारे शासनकर्ते हवेत !
  • आतंकवाद्यांनी घुसखोरी करायची, सैन्याने त्यांचा शोध घेत बसायचे, कालांतराने आतंकवाद्यांनी आक्रमण करून अनेक सामान्य नागरिकांना ठार मारायचे आणि नंतर नेत्यांनी केवळ शोक व्यक्त करायचा, असे आणखी किती दिवस चालू द्यायचे ? लोकहो, या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

चंडीगड – पंजाबमध्ये ‘जैश-ए-महंमद’ या जिहादी आतंकवादी संघटनेचे ७ आतंकवादी घुसले असल्याची माहिती समोर आली आहे. हे आतंकवादी देहलीच्या दिशेने पुढे सरकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाला मिळाली. त्यानंतर संपूर्ण पंजाबसह देहलीतही अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली आहे. आतंकवादी घुसल्याची माहिती मिळताच सैनिक आणि पोलीस यांनी गस्त वाढवली असून सुरक्षायंत्रणा आतंकवाद्यांचा शोध घेत आहेत.

१४ नोव्हेंबरला ४ संशयितांनी पठाणकोटच्या माधोपूर भागातून बंदुकीचा धाक दाखवत १ कार पळवून नेल्याची घटना घडली. त्यांनी काश्मीरहून पठाणकोटला जाण्यासाठी ही कार आरक्षित केली होती. तथापि माधोपूर परिसरात येताच त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून कारचालकाला कारमधून बाहेर फेकले अन् वाहन घेऊन फरार झाले. या घटनेनंतर कारचालकाने तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पंजाब आणि जम्मू-काश्मीर पोलीस मिळून माधोपूर परिसरात या संशयितांचा शोध घेत आहेत. याशिवाय ‘सीसीटीव्ही फूटेज’ही तपासले जात आहेत.


Multi Language |Offline reading | PDF