राममंदिरासाठी विहिंप धर्मसभांचे आयोजन करणार !

  • भाजप सत्तेत असतांना विहिंपला राममंदिरासाठी धर्मसभांचे आयोजन का करावे लागते ? विहिंपनेही भाजपला गेल्या ४ वर्षांत याविषयी कायदा करण्यास का भाग पाडले नाही ?
  • सत्ता नसतांना भाजपला ‘राममंदिर’ आठवते, तर सत्ता असतांना केवळ ‘विकास’ आठवतो, हेच भाजपच्या भूमिकेवरून स्पष्ट होते ! अशा भाजपवर हिंदूंनी तरी कसा विश्‍वास ठेवावा ?
विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष चंपत राय आणि अन्य

लक्ष्मणपुरी (लखनौ) – सरकार आणि न्यायालय यांच्यापर्यंत हिंदूंच्या भावना पोहोचवण्यासाठी विहिंपकडून धर्मसभांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष चंपत राय यांनी दिली. ते येथे पत्रकारांशी बोलत होते. याशिवाय देशभरात ५ सहस्र प्रार्थनासभाही घेण्यात येणार आहेत. राय पुढे म्हणाले, ‘‘२५ नोव्हेंबर या दिवशी विहिंप अयोध्येत धर्मसभेचे आयोजन करणार असून त्यात १ लाख लोक सहभागी होतील, असा अंदाज आहे.

त्यानंतर ९ डिसेंबरला नवी देहली येथेही धर्मसभेचे आयोजन करण्यात आले असून त्यास ५ लाख लोक उपस्थित रहातील, अशी अपेक्षा आहे. हिंदूंच्या भावना समजून घ्यायला हव्यात. राममंदिराच्या बांधकामासाठीचा लढा ५०० वर्षांपासून चालू असून आता आणखी प्रतीक्षा करणे कठीण आहे. ‘अयोध्येत राममंदिराच्या बांधकामाला अनुकूल असाच निर्णय सर्वोच्च न्यायालय देईल’, असा विश्‍वास हिंदूंना आहे. राममंदिरासाठी दगडांचे कोरीव काम पूर्ण करण्यात आले आहे.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now