कल्याण येथे हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे हिंदूंच्या धर्मांतराचा छुपा उद्देश असणारा कार्यक्रम अखेर रहित !

कल्याण येथील या आठवड्यातील दुसरी घटना

धर्मांतराच्या कार्यक्रमाला वैध मार्गाने विरोध करून तो रहित करण्यास लावणार्‍या हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन !

‘सिटी ऑफ होप’ने काढलेली निमंत्रणपत्रिका

कल्याण, १५ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘सिटी ऑफ होप’ प्रस्तूत पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाच्या निमित्त ‘राष्ट्रीय बाळदिन महोत्सवा’चे १४ नोव्हेंबरला आयोजित करण्यात येणार होते. या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका काही हिंदुत्वनिष्ठांंच्या हाती लागल्यावर त्यात केवळ ख्रिस्ती पंथाच्या प्रसाराद्वारे हिंदूंचे धर्मांतर होण्याची दाट शक्यता असल्याचे लक्षात आले. तेव्हा कल्याण येथील हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन कल्याणचे साहाय्यक पोलीस आयुक्त आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिले. अशा प्रकारच्या कार्यक्रमात कल्याण (पूर्व) येथे गुन्हा नोंद झाला असल्याचे यंत्रणांना पुराव्यासह दाखवण्यात आले. प्रशासनाने याची गंभीर नोंद घेत कार्यक्रम घेण्यास आयोजकांना नकार दिला.

१. या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त ‘राष्ट्रीय बाळदिन महोत्सव’, असे गोंडस नाव देत ‘सर्व बालकांना घेऊन त्यांच्या पालकांनी या कार्यक्रमात यावे’, असे आवाहन करण्यात आले होते.

२. या निमंत्रण पत्रिकेवर ‘येशूने म्हटले आहे की, बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका’, असा संदेश लिहिण्यात आला होता.

३. या कार्यक्रमाचे आयोजन ‘सिटी ऑफ होप’ यांनी केले होते.

४. राष्ट्रीय वक्ते रेव्ह. भालचंद्र कांबळे (पुणे) यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार होते. ब्र. रज्जू काळे यांचे ख्रिस्ती उपासना भजन मंडळ, चेंबूर यांच्या भजनांचा कार्यक्रम होणार होता. ब्र. जॉन मेहम्या आणि संघ, ठाणे यांचा गायनाचा कार्यक्रम होता. सिस्टर साळवी (अमरावती) यांच्या ‘पपेट शो’चे आयोजन करण्यात आले होते.

५. या कार्यक्रमात सामुदायिक प्रार्थना घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते, तसेच कार्यक्रमासाठी आर्थिक साहाय्य देण्याचे आवाहन करण्यात आले होते.

६. ‘आपण सर्वांनी आपल्या मुलांसह कार्यक्रमास येऊन येशूचे आशीर्वाद मिळवा’, असेही नमूद करण्यात आले होते.

७. ही माहिती वाचून हिंदुत्वनिष्ठांनी निवेदन दिले आणि तेव्हा प्रशासनाने कार्यक्रम रहित केला.

८. हा कार्यक्रम छुप्या मार्गाने होऊ नये; म्हणून १४ नोव्हेंबरच्या सकाळी काही हिंदु युवक अत्रे रंग मंदिरात चौकशीसाठी गेले असता काही ख्रिस्ती महिला नाट्यगृहात दिसल्या. त्यांना विचारले असता ‘आजचा कार्यक्रम होणार नाही’, असे कळाले.

९. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतील भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क साधला असता ‘आम्ही लवकरच हा कार्यक्रम पुन्हा आयोजित करू’, असे सांगण्यात आले.

१०. या सर्व सूत्रांमुळे ‘या कार्यक्रमात हिंदूंना लक्ष्य करून ख्रिस्ती पंथाचा स्वीकार करण्यासाठी प्रवृत्त केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही’, असे समस्त हिंदुत्वनिष्ठांना लक्षात आले.

११. कल्याणचे भाजप आमदार श्री. नरेंद्र पवार, भाजपच्या नगरसेविका तथा कल्याणच्या उपमहापौर सौ. उपेक्षा भोईर, भाजपचे नगरसेवक तथा स्थायी समितीचे अध्यक्ष श्री. राहुल दामले यांनी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन यांना कार्यक्रमातील छुप्या षड्यंत्राची सत्यता दाखवून हा कार्यक्रम रहित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

१२. भाजप शहर कल्याण उपाध्यक्ष आधुनिक वैद्य उपेंद्र डहाके यांनी पुढाकार घेऊन विश्‍व हिंदु परिषदेचे जिल्हा संपर्क प्रमुख श्री. पराग तेली, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. सुनील शेट्टी आणि सौ. अंजु अरोरा, अधिवक्ता श्री. रोशन जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिल तिवारी, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे धारकरी श्री. शुभम गोवेकर, श्री. गणेश पवार आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. अरुण कुलकर्णी यांनी सक्रीय सहभाग घेतला. (आपल्या पदांचा उपयोग हिंदु धर्म रक्षणासाठी करणार्‍या नेत्यांकडून अन्य लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी शिकावे ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF