बांगलादेश सरकार आजपासून २ सहस्र २६० रोहिंग्या मुसलमानांना परत पाठवणार

भाजप सरकारने केवळ ७ रोहिंग्यांना परत पाठवले !

  • जे बांगलादेशसारख्या इस्लामी राष्ट्राला जमते, ते हिंदूबहुल भारतातील हिंदुत्वनिष्ठ भाजप सरकारला का जमत नाही ? हे सरकारला लज्जास्पद !
  • बलाढ्य भारतातील भाजप सरकार केवळ ७ घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना परत पाठवते, तर छोटासा बांगलादेश २ सहस्र २६० रोहिंग्यांना परत पाठवतो. यावरून भाजप सरकारची राष्ट्रहिताची इच्छाशक्ती आणि कार्यक्षमता किती आहे, हेच दिसून येते ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
  • हिंदूबहुल भारतात साडेचार लाख काश्मिरी हिंदूंना विस्थापित व्हावे लागते, तर शेकडो घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना देशात सुखनैव राहू दिले जाते ! हे असेच चालू राहिले, तर भारतही इस्लामबहुल व्हायला वेळ लागणार नाही ! असे होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा !

तेकनाफ (बांगलादेश) – बांगलादेश सरकारकडून १५ नोव्हेंबरला २ सहस्र २६० रोहिंग्या मुसलमानांना दक्षिण पूर्वेवरी, कॉक्स बाजार या जिल्ह्यांतील सीमेवरून म्यानमारला परत पाठवण्यात येणार आहे. म्यानमारमध्ये परत पाठवले जाण्याच्या भीतीमुळ रोहिंग्या मुसलमान अन्यत्र पसार झाले आहेत. म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांनी तेथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार केल्याने म्यानमारच्या सैनिकांनी त्यांना हुसकावून लावले. त्यानंतर रोहिंग्या मुसलमानांनी म्यानमारमधून पळ काढत प्रामुख्याने भारत आणि बांगलादेश या राष्ट्रांमध्ये आश्रय घेतला.

संयुक्त राष्ट्र संघाने हा वंशभेद असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांना पुन्हा म्यानमारमध्ये पाठवले जाण्याची शक्यता आहे. परत पाठवण्याच्या सूचीमध्ये अग्रक्रमाने नावे असलेले रोहिंग्या मुसलमान पसार झाले आहेत.

केंद्रातील भाजप सरकारने केवळ ७ रोहिग्यांना परत पाठवले !

केंद्रातील भाजप सरकारने ऑक्टोबर मासात आसाममध्ये अनधिकृतपणे रहाणार्‍या ७ रोहिंग्या मुसलमानांना म्यानमारला परत पाठवले होते. रोहिंग्या मुसलमानांना परत पाठवण्यासाठी सरकारचे ते पहिले पाऊल होते. या ७ जणांना वर्ष २०१२ मध्ये पकडण्यात आले होते. तेव्हापासून ते आसाममधील सिलचरस्थित कछार केंद्रीय कारागृहात होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now