भाजपच्या रथयात्रा रोखणार्‍यांना रथाखाली चिरडू ! – लॉकेट चॅटर्जी, अध्यक्षा, भाजप महिला मोर्चा, बंगाल

भाजपला अशी चीड हिंदूंवरील आघातांच्या विरोधात का येत नाही ?

कोलकाता – बंगालमध्ये लोकशाही स्थापन करण्याच्या उद्देशाने भाजपच्या वतीने काढण्यात येणार्‍या रथयात्रा रोखण्याचा जे प्रयत्न करतील, त्यांना रथाच्या चाकाखाली चिरडून टाकू, अशी चेतावणी भाजपच्या राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्षा लॉकेट चॅटर्जी यांनी मालदा जिल्ह्यात प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे ५, ७ आणि ९ डिसेंबर या दिवशी बंगालच्या सर्व ४२ मतदारसंघांत रथयात्रा काढणार आहेत. या यात्रांच्या समाप्तीनंतर कोलकाता येथे एक सभा होणार असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.

तृणमूल काँग्रेसकडून निषेध

चॅटर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना सत्तारुढ तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी म्हणाले, ‘‘भाजपचे नेते प्रक्षोभक वक्तव्ये करून राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. बंगालमधील लोक भाजपचे फुटीरवादी राजकारण यशस्वी होऊ देणार नाहीत.’’ (शांतता वगैरे शब्द तृणमूल काँग्रेसला शोभतात का ? आतापर्यंत तृणमूल काँग्रेसने राज्यात कायद्याचे राज्य कधी केले आहे का ? राज्यात हिंसाचार पसरू देणार्‍यांनी इतरांना शांततेचे डोस पाजणे हास्यास्पद ! – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now