लंडनच्या श्री स्वामीनारायण मंदिरातून भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तींची चोरी

जगभरातील हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! ‘जगभरातील मंदिरांच्या सुरक्षेसाठी पावले उचला’, असे केंद्रातील भाजप सरकारला सांगून काही उपयोग नाही; कारण सरकार भारतातील मंदिरांचेही रक्षण करू शकत नाही ! यास्तव हिंदु राष्ट्रच हवे !

लंडन – विल्सडन येथील श्री स्वामीनारायण मंदिरातील श्रीकृष्णाच्या ३ मूर्तींसह रोकड आणि इतर सामान चोरांनी ९ नोव्हेंबर या दिवशी चोरून नेले. ऐन दिवाळीत मंदिरात चोरी झाल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष कुर्जीभाई केराई यांनी दिली. या मंदिराची स्थापना वर्ष १९७५ मध्ये झाली. तेव्हापासून या मूर्ती मंदिरात आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या या मूर्तींवर भाविकांची पुष्कळ श्रद्धा होती.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अन्वेषण आरंभले आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. लंडनमध्ये श्री स्वामीनारायण यांची अनेक मंदिरे आहेत. त्यातील विल्सडनमधील मंदिर प्रसिद्ध आहे. उत्तर लंडनमध्ये युरोपातील सर्वांत मोठे श्री स्वामीनारायण यांचे मंदिर आहे. या मंदिराच्या व्यवस्थापनानेही विल्सडन येथील चोरीच्या घटनचा निषेध केला आहे. लंडनचे महापौर सादिक खान यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती येथील हिंदूंनी केली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now