केरळ सरकारच्या विरोधात भाजप ‘शबरीमला संरक्षण रथयात्रा’ काढणार !

रथयात्रा काढून शबरीमलाचा प्रश्‍न सुटेल कि त्याविषयीचा अध्यादेश काढून सुटेल ? रथयात्रा काढून वेळ आणि पैसा व्यय करण्यापेक्षा केंद्रात सत्ता असतांना भाजप सरकार थेट अध्यादेशच का काढत नाही ?

बेंगळूरू – शबरीमला मंदिरात निषिद्ध वयोगटांतील महिलांना प्रवेशबंदीच्या सूत्रावरून भाजपकडून केरळ सरकारच्या विरोधात ‘शबरीमला संरक्षण रथयात्रा’ काढण्यात येणार आहे. केरळ प्रदेशाध्यक्ष पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांच्या नेतृत्वात ही रथयात्रा कर्नाटक राज्यातून निघून केरळमधील शबरीमला मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. या रथयात्रेत मोठ्या संख्येने साधू-संत, ६२ बिशप आणि १२ मौलाना सहभागी होणार आहेत.

या रथयात्रेविषयी कर्नाटकचे भाजपचे माजी मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा म्हणाले, ‘‘महिलांच्या प्रवेशावरून शबरीमला येथे झालेल्या हिंसाचाराला केरळ सरकार उत्तरदायी आहे. शबरीमला प्रकरणी केरळ सरकारला सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडता आली नाही. आमचा पक्ष न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करत नाही; मात्र लोकभावनेचा आदर करतो. केरळ सरकारने न्यायालयात फेरयाचिका प्रविष्ट करून हा निर्णय पालटावा.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now