सनातनच्या ज्ञान-प्राप्तकर्त्या साधकांविषयी साधकांना जाणवलेली सूत्रे

१ नोव्हेंबर २०१८ या दिवशी सनातनच्या सूक्ष्म ज्ञान प्राप्तकर्त्या साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्यांच्याविषयी साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

श्री. राम होनप
श्री. निषाद देशमुख
कु. मधुरा भोसले

१. कु. तृप्ती कुलकर्णी

‘गुरु दत्तात्रेयांकडून आपल्याला ज्ञान मिळते. या तिघांद्वारे ज्ञान मिळत असल्यामुळे आधीपासूनच ‘हे तिघे म्हणजे साक्षात् त्रिमूर्तीच आहेत’, असा माझा भाव आहे. आज तिघेही जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे आज गुरुवार असून हा दत्तात्रेयांचा वार आहे. हे लक्षात आल्यावर माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.

एकदा गुरुदेवांनी धारिकांसंदर्भातील काही कार्यपद्धती आणि बारकावे सांगितले होते. त्या कार्यपद्धती तिघांनाही सांगण्यास त्यांनी सांगितले होते. ही सेवा तिघा ज्ञान-प्राप्तकर्त्या साधकांना सांगितल्यावर ते तिघेही सर्व कार्यपद्धतींचे तंतोतंत पालन करत आहेत.

एकदा प.पू. डॉक्टरांनी त्या तिघांना ‘त्यांची या आणि या मागील जन्माची साधना कोणती होती’, यासंदर्भातील ज्ञान घ्यायला सांगितले. यासंदर्भात प.पू. डॉक्टर म्हणाले की, ‘आपण कोणाच्याही साधनेविषयी ज्ञान घ्यायला सांगत नाही. त्यांची गेल्या जन्मांची तेवढी साधना आहे !’ तेव्हा ‘ते मागील जन्मांत ऋषि-मुनी होते, असे मला वाटले. ‘ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटणार’, हे घोषित करण्याआधी ‘त्यांचे नाव भारतभरात कसे जाऊ शकेल’, याची प.पू. डॉक्टरांनाच पुष्कळ तळमळ होती. त्यांची गुणवैशिष्ट्यांची धारिका सिद्ध झाल्यावर

प.पू. डॉक्टरांना अन्य काही सूत्र आठवल्यास ते तेवढे सूत्र सांगून धारिका अद्ययावत करून घेत असत.’’

२. सौ. अरुणा तावडे

‘गुरूंचा प्रत्येक शब्द झेलण्याचा त्या तिघांचा भाव असतो. ते तिघेही आध्यात्मिक त्रासाच्या विरोधात जिद्दीने आणि तळमळीने लढतात. ते सनातनचे ‘हिरे’ आहेत.’

३. श्री. अविनाश जाधव

‘तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही श्री. रामदादा कधीच त्रासलेला वाटत नाही. भोजनकक्षात महाप्रसाद ग्रहण करतांना श्री. निषाद आला, तर तो सर्वांना सामावून घेऊन एखादे सूत्र चांगल्या पद्धतीने सांगतो. कु. मधुराताईंनी रेखाटलेल्या चित्रांकडे पाहून भावजागृती होते.’

४. सौ. संगीता चौधरी

‘मधुराताई १० वर्षांपूर्वी दक्षिण भारतात प्रसाराला असतांना तिच्याकडून ‘अध्यात्म आणि भाव काय आहे ?’, हे शिकायला मिळाले.’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now