मॅच फिक्सिंग प्रकरणी आरोप झालेले महंमद अझरुद्दीन यांना मैदानावरील घंटा वाजवण्याचा मान का ? – गौतम गंभीर यांच्याकडून अप्रसन्नता व्यक्त

महंमद अझरुद्दीन यांना सामान्याआधी घंटा वाजवण्याचा मान दिल्याचे प्रकरण

क्रिकेटला फिक्सिंगचा डाग लागला आहे ! त्यावर प्रशासकीय समित्यांची अशी बोटचेपी भूमिका असल्यामुळेच फिक्सिंगचे प्रकार रोखणे अशक्य आहे !

नवी देहली – कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानात भारत-वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या पहिल्या ‘टी-२०’ क्रिकेट सामन्याच्या आधी ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’ने (‘बीसीसीआय’ने) प्रथेप्रमाणे या मैदानावरील घंटा वाजवण्याचा मान भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महंमद अझरुद्दीन यांना दिला. यावर आक्षेप घेत क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी ‘मॅच फिक्सिंग प्रकरणी आरोप झालेल्या व्यक्तीला हा मान का दिला’, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

टि्वटरवरून अप्रसन्नता व्यक्त करतांना गौतम गंभीर म्हणाले, ‘‘पहिल्या सामन्यात मला एक गोष्ट पुष्कळ खटकली. भ्रष्टाचारी लोकांविषयी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, प्रशासकीय समिती आणि बंगाल क्रिकेट संघटना यांची काहीच ठोस भूमिका दिसत नाही. ईडन गार्डन्सवर सामन्यापूर्वी अझरुद्दीन यांना घंटा वाजवण्याचा मान मिळणे, हे फार धक्कादायक आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF