बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथील मशिदीच्या उंच मिनारामुळे जिवाला धोका : गावकर्‍यांचा विरोध

जिल्हा प्रशासनाकडून तातडीने काम थांबवण्याचा आदेश

  • हिंदूंनी विरोध केल्यावर कारवाई करणारे सुस्त प्रशासन ! जी गोष्ट जनतेच्या लक्षात येते, ती प्रशासनाच्या लक्षात का येत नाही ?
  • मंदिरे अनधिकृत ठरवून ती पाडणारे प्रशासन अन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळांच्या अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करते, हे जाणा ! यास उत्तरदायी असलेल्यांना दंडित करा !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – येथील अमरगढ गावात मशिदीच्या उंच मिनाराच्या बांधकामाला गावातील लोकांनी जिवाला धोका असल्याचे सांगत विरोध चालू केला आहे. त्यामुळे गावातील हिंदू आणि मुसलमान यांच्यात वाद निर्माण झाला असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावाचे सरपंच ओम प्रकाश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जुलै २०१५ मध्ये या मिनाराच्या उभारणीचे काम चालू झाले. आर्थिक अडचणींमुळे हे काम काही काळ थांबले होते; मात्र ते आता पुन्हा चालू झाले आहे. आरंभी हिंदूंनी त्याला विरोध केला नव्हता; मात्र आता मिनाराची उंची ७० फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे जिवाला धोका असल्याची भीती गावकर्‍यांच्या मनात आहे; म्हणून आम्ही यावर आक्षेप घेतला. मिनारची उंची न्यून करण्यास मुसलमानांची सिद्धता नसल्याने गावातील वातावरण तणावाचे बनले आहे.’ जिल्हा प्रशासनाने तातडीने काम थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर आता अंतिम टप्प्यात आलेले हे बांधकाम थांबले आहे. पोलीस आणि प्रशासन गावातील तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now