अयोध्येत राममंदिर उभारा ! – केंद्रीय शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांचे पंतप्रधानांना पत्र

बाबराच्या सेनापतीनेच राममंदिराचे भंजन केल्याची माहिती !

समाजाच्या सर्व स्तरांतून राममंदिर निर्मितीसाठी अनुकूल वातावरणनिर्मिती होत असतांना सरकारच्या अनिच्छेमुळे ते काम पुढे सरकत नाही ! आता मुसलमान समाजातून प्रस्ताव आल्यानंतर तरी याचा गांभीर्याने विचार होणार का ?

लखनौ – ‘केंद्रीय शिया वक्फ बोर्डा’चे अध्यक्ष  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा राममंदिर निर्मितीचा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावाद्वारे त्यांनी अयोध्या येथे राममंदिराची निर्मिती आणि लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे नियोजित स्थानावर मशीद बांधावी, असे म्हटले आहे. ‘या मशिदीचे बांधकाम ‘शिया वक्फ बोर्ड स्वतः करील’, असेही रिझवी यांनी म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, ‘‘बाबराचा सेनापती मीराबंकी शिया मुसलमान होता. त्याने राममंदिराचे भंजन करून मशिदीच्या आकाराचा वादग्रस्त ढाचा बांधला होता. वर्ष १९४४ मध्ये त्या ढाच्यावर ‘सुन्नी वक्फ बोर्डा’ने अधिकार सांगितला होता. त्याची न्यायालयीन लढाई अद्याप चालू आहे. नियमानुसार शिया समाजातील व्यक्तीने स्वतःच्या अधिकारात केलेले बांधकाम ‘शिया वक्फ बोर्डा’ची संपत्ती मानली जाते. त्यामुळे ती वादग्रस्त वास्तू ‘केंद्रीय शिया वक्फ बोर्डा’ची संपत्ती आहे.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now