मुंबईत मानखुर्द येथे फटाके फोडल्याविषयी पहिला गुन्हा नोंद

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे अनेक ठिकाणी सर्रास उल्लंघन होत असतांना तक्रार प्रविष्ट होण्याची वाट पहाणारे पोलीस निष्क्रीय नव्हेत का ? ध्वनी आणि वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणार्‍या अन् जनतेला त्रासदायक ठरणार्‍या फटाक्यांवर सरकार पूर्णपणे बंदी का घालत नाही ?

मुंबई – नियम मोडून मुंबईत फटाके फोडणार्‍या २ मुलांवर मानखुर्द येथे पहिला गुन्हा नोंद झाला आहे. शकील अहमद नावाच्या व्यक्तीने याविषयी तक्रार दिली होती. ‘फटाके उडवू नका’, असे सांगूनही या दोन मुलांनी ऐकले नाही; म्हणून तक्रार दिली’, असे त्यांनी सांगितले.

फटाक्यांमुळे नालासोपारा येथे भीषण आग

नालासोपारा येथील केमिकल आणि पुठ्ठा बनवणार्‍या २ आस्थापनांना ७ नोव्हेंबर या दिवशी भीषण आग लागली. फटाक्यांमुळे ही आग लागल्याचे बोलले जाते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now