पाकिस्तानमधील सर्व अधिकोषांमधील माहिती चोरीला

ग्राहकांच्या खात्यातून सहस्रो-कोटी रुपये लंपास ?

देशांतर्गत एवढा अनाचार माजलेला असूनही पाकच्या कार्यक्रमपत्रिकेवर पहिला कार्यक्रम भारतीय सीमेवर हिंसाचार माजवणे, हाच असतो !

data of major Pakistani banks hacked

इस्लामाबाद – पाकिस्तानात सर्व मोठ्या अधिकोषांवर सायबर आक्रमण झाले असून ग्राहकांच्या खात्यातून सहस्रो-कोटी रुपये लंपास झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानच्या सायबर सुरक्षा अन्वेषण यंत्रणेचे प्रमुख महंमद शोएब यांनी अधिकोषांवरील या आक्रमणाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या प्रकरणी अन्वेषण यंत्रणांनी अनेक सायबर गुन्हेगारांच्या टोळ्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरलेली रक्कम वसूल करण्यात आल्याचेही शोएब यांनी सांगितले आहे. पाकिस्तानातील ‘जिओ न्यूज्’ने याविषयीचे वृत्त प्रसारित केले आहे. अनेक पाकिस्तानी अधिकोषांनी त्यांच्या खातेदारांना सुरक्षेच्या कारणास्तव ऑनलाईन बँकिंग सेवा बंद करण्यात येत असल्याचे कळवले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now