विद्रोही विचारमंचाच्या वतीने मनुवादी वृत्तीचे दहन केल्याचा कांगावा

मनुवादी वृत्ती असे काही नसतांना जातीय विद्वेषामुळे त्याचा कांगावा करत दहन करणारे जात्यंधच म्हणावे लागतील. अशांकडून समाज तोडण्याचेच काम होणार हे निश्‍चित !

नगर, ८ नोव्हेंबर – बलीप्रतिपदेला बळीराजाची हत्या झाली, असा दावा करत या हत्येचा निषेध व्यक्त करीत मनुवादी वृत्तीच्या विद्रोही विचारमंचच्या वतीने प्रतिकात्मक दहन करण्यात आले. इडापीडा टळून बळीचे राज्य येण्याची घोषणा करण्यात आली. अरणगाव रोड येथील इंदिरानगर येथे जालिंदर चोभे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. महिलांना मंदिरात प्रवेश देण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही गोंधळ घालून न्यायालयाचा अवमान केला जात आहे. पुन्हा मनुवादी विचारसरणी समाजात सक्रीय होत असल्याने या प्रवृत्तीचे दहन करण्यात आल्याचे विद्रोही विचारमंचच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. (मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करण्याविषयी न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले जात नाही, याविषयी विद्रोही विचारमंचवाले मात्र मूग गिळून गप्प ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF