रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात चौथा पंचमुखी हनुमानकवच यज्ञ संपन्न !

परात्पर गुरु डॉ.आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या व्यापक कार्यातील वाईट शक्तींचे अडथळे दूर व्हावेत आणि साधकांचे रक्षण व्हावे, यांसाठी यज्ञाच्या वेळी केला संकल्प !

१. आसंदीत बसलेले प.पू. दास महाराज, २. पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक, ३. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, ४. यज्ञात पूर्णाहुती देतांना पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ आणि मंत्रपठण करतांना पुरोहित वर्ग

रामनाथी (गोवा), ८ नोव्हेंबर (वार्ता.) – परात्पर गुरु डॉ.आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या व्यापक कार्यातील वाईट शक्तींचे अडथळे दूर व्हावेत आणि साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २२ ऑक्टोबर या दिवशी चौथा ‘पंचमुखी हनुमान-कवच यज्ञ’ चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला. पानवळ, बांदा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील संत प.पू. दास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत झालेल्या पंचमुखी हनुमानकवच यज्ञांपैकी हा ५० वा यज्ञ होता. या यज्ञाचे यजमानपद सनातनचे संत पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी भूषवले. या वेळी सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती होती. पुरोहित साधक श्री. दामोदर वझेगुरुजी यांच्यासह सनातनच्या पुरोहितांनी यज्ञविधीत सहभाग घेतला. प.पू. दास महाराज यांच्या पत्नी पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांनीही यज्ञविधींच्या वेळी काही मंत्र म्हटले.

पंचमुखांसाठी आहुती दिल्यानंतर हनुमानकवच स्तोत्रपठण करून आहुती देण्यात आल्या. त्यानंतर प्रायश्‍चित्तहोम, बलीदान आणि पूर्णाहुतीने झाल्यावर आरती अन् प्रार्थना करून यज्ञाची सांगता करण्यात आली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now