वाराणसी येथील सौ. श्रेया प्रभु (वय ४१ वर्षे) आणि कु. जयासिंह (वय १७ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

धनत्रयोदशीला वर्षा झाली गुरुकृपेची । वाराणसी सेवाकेंद्रात उधळण झाली आनंदाची ॥

डावीकडून सौ. श्रेया प्रभु, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, पू. नीलेश सिंगबाळ आणि कु. जया सिंह

वाराणसी – धनत्रयोदशीच्या दिवशी येथील सेवाकेंद्रात पार पडलेल्या एका सत्संगात हिंदु जनजागृती समितीचे उत्तर आणि पूर्वोत्तर भारत मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी सौ. श्रेया प्रभु (वय ४१ वर्षे) आणि कु. जया सिंह (वय १७ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असल्याचे एका सत्संगात घोषित केले. दीपावलीच्या निमित्ताने श्रीकृष्णाने ही आनंदवार्ता दिल्याने सत्संगाला उपस्थित सर्व साधकांचा आनंद द्विगुणीत झाला.

या सत्संगाला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची वंदनीय उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते सौ. श्रेया प्रभु यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळेे म्हणाले, ‘‘गुरुकार्याप्रती समर्पण आणि सातत्य ठेवल्यामुळे, तसेच मोह-माया यांचा त्याग केल्यामुळे सौ. श्रेया प्रभु यांची जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटका झाली आहे.’’

त्यानंतर कु. जया सिंह यांचा सत्कार पू. नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करतांना पू. सिंगबाळ म्हणाले, ‘‘कु. जया सिंह या विविध सेवा तल्लीन होऊन करतात. शिकणे आणि सेवा आत्मसात करणे यांसाठी त्या प्रयत्नरत असतात. झोकून देऊन सेवा करणे, स्वभावदोष आणि अहं निर्मूलनासाठी प्रयत्न करणे आदी दैवी गुण त्यांच्यामध्ये आहेत.’’

कु. जया सिंह यांच्याविषयी सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘कु. जया सिंह सेवाकेंद्राशी समरस आणि एकरूप झाल्या आहेत. त्यांच्यात सेवेची आवड-निवड नाही. नवीन सेवा शिकण्याची तळमळ, व्यापकता आणि भाव या गुणांमुळे कु. जया याही जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटल्या आहेत.’’

‘हे सर्व सद्गुरु (डॉ.) पिंगळेकाका आणि पू. नीलेश सिंगबाळ यांच्यामुळेच झाले !’ – सौ. श्रेया प्रभु

मनोगत व्यक्त करतांना सौ. श्रेया प्रभु म्हणाल्या, ‘‘आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करायला हवेत, असे वाटायचे; मात्र माझ्याकडून प्रयत्न होत नव्हते. सद्गुरु पिंगळेकाका आणि पू. नीलेशदादा यांच्यामुळेच माझे प्रयत्न होऊन माझी उन्नती झाली.’’

सौ. श्रेया प्रभु यांचे कुटुंबीय त्यांच्याविषयी म्हणाले की, सौ. श्रेया लहानपणापासून भिडस्त स्वभावाची होती. ती एकटी कुठेही जात नसे. आता बिहार, उत्तरप्रदेश येथे कोणतीही भीती न बाळगता अध्यात्मप्रसारासाठी जाते. हे सर्व परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच झाले.

‘सेवा करतांना ‘मला ईश्‍वर पहात आहे’ एवढाच विचार असायचा !’ – कु. जया सिंह

कु. जया त्यांचे मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या, ‘‘मी कोणतेही विशेष प्रयत्न केले नाहीत. केवळ सेवा करतांना ‘मला ईश्‍वर पहात आहे’ एवढाच माझा विचार असायचा. मला ईश्‍वरप्राप्ती करायची आहे, तर दोष आणि अहं यांना घेऊन बसायचे नाही. कोणतीही प्रतिमा ठेवायची नाही. सेवाकेंद्रातील सर्व साधकांनी मला पुष्कळ साहाय्य केले आणि प्रेम दिले. हेच माझे कुटुंब आहे, असे वाटते. कोणी चूक सांगितल्यावर कृतज्ञता वाटते. फलकावर चूक लिहितांना ‘चूक फलकावर लिहिली, तर माझे प्रारब्ध कसे नष्ट होणार आहे’, असा विचार असायचा.’’

कु. जया यांचे वडील श्री. सोनराज सिंह म्हणाले, ‘‘मी जे करू शकत नाही, ते माझ्या मुलांनी अवश्य करावे’, अशी माझी इच्छा होती. मी हिंदु राष्ट्रासाठी त्याग करू शकलो नाही; पण जयाने माझी इच्छा पूर्ण केली. हे केवळ परमपूज्यांमुळेच झाले.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now